केंद्रिय मंत्री नारायण राणेंचे दुखन वाढले ,मोदी सरकारने त्यांचा बंगला पाडण्याचे आदेश काढले ?

0
57

आपल्या स्थानिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि जाहिराती महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहचविणारे एकमेव,निर्भिड चॅनल ” महाराष्ट्र न्यूज ” साठी जाहिराती व बातम्या साठी संपर्क करा.तसेच संपूर्ण राज्यात ” पत्रकार ” नियुक्त केले जात आहेत. संपर्क : भारत पवार: मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.९१५८४१७१३१.                                                 मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या ” कल्लोळ ” रंगला असून राणे विरूद्ध ठाकरे सरकार असे समीकरण बनले आहे.महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांचे चांगलेच जुंपले असल्याचे दिसते आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण दूषित झाले आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ह्या राजकारणाकडे ” महाराष्ट्रात काय रंगलाय राजकारणाचा तिखट रस्सा ” असे म्हणून ” रश्याची ” मजा घेत आहेत.भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समस्यांचे दुखणे वाढले असले तरी ते शिवसेनेवर तिखट रश्या प्रमाणे आग ओतण्याची एकही चान्स सुटू देत नाहीत .अलीकडेच नारायण राणेंचे मुंबई येथील घरावर मुंबई महापालिका कारवाई करण्यात पुढे सरसावली असतानाच दुसरीकडे मालवण जिल्ह्यातील ” नीलरत्न ” बंगलाह जमीनदोस्त होण्याची शक्यता बोलली जात आहे.मोदी सरकारने याबाबत पुढाकार घेतला असल्याची माहिती समोर आली असून त्याबाबत आदेशही जारी केल्याची माहिती उजेडात आली आहे.मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटुंबीयांचा शानदार नीलरत्न बंगला उभा आहे.हा बंगला बांधताना सीआर झेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती.तर मुंबई येथील जुहू येथील अधिश बंगल्या बाबत कारवाई करण्याची हालचाल मुंबई महापालिकेने सुरू केली आहे .आपल्या बंगल्याचे एका इंचाचेही अतिक्रमण बांधकाम नसल्याची माहिती राणेंनी यावेळी दिली .राणे कुटुंबीय आता कोणती भूमिका घेतात राणेंच्या घरावर हातोडा चालतो की बंद पडतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख पहारा ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here