नवी मुंबई च्या सेंट ऑगस्टीन शाळेच्या आडमुठे पणा मुळे शिक्षण खात्याची नोटीस : शाळेची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये ? शिक्षणाधिकारी संखे

0
36

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_ आज नवी मुंबईतील नेरुळ येथील सेंट ऑगस्टीन शाळेला आपली मान्यता का रद्द करू नये अशी नोटिस शिक्षण अधिकारी संखे म्याडम यांच्या तर्फे देण्यात आली . या शाळेने ज्या विद्यार्थ्यांनि फी भरली नाही असल्या मुलांना शाळेच्या ऑनलाईन क्लास मधून बाहेर काढले असता पालकांनी नवी मुबई ब’ प्रभाग समिती सदस्य श्री विजय बाबासाहेब साळे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले त्यानंतर यांनी पालकांना घेऊन थेट शिक्षण अधिकारी यांचे ऑफीस गाठले आणि त्यांना पालकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी सादर केल्या तेव्हा शिक्षण अधीकारी संखे म्याडम यांनी शाळेला भेट दिली व मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली व त्यांना शाळेची मान्यता का रद्द करूनये अशी नोटीस बाजावली असून असे प्रकार पुन्हा घडल्यास शाळेवर कारवाई करन्यात येईल असे सांगितले तसेच शाळेने विद्यार्थ्यांची फक्त ट्युशन फी घेण्याचे मान्य केले असून कोणत्याही मुलाला ऑनलाईन क्लास मधुन काढण्यात येनार नाही व कोणत्याही विद्यार्थ्यांना ओपन हाऊस मधून वगळण्यात येणार नाही असे मुख्याध्यापक यांनी असे आश्वासन शिक्षणअधीकारी संखे म्याडम व श्री विजय साळे याना देण्यात आले आहे. या बाबत विजय साळे याना विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्या कडे रोज बऱ्याच पालकांच्या तक्रारी आल्या आहेत आम्ही शाळेच्या मुख्यध्यापकाना भेटलो परंतु ते काही आमचे म्हणेने ऐकून घेण्यास तयार नव्हते म्हणून आम्हास नवी मुंबईच्या शिक्षण अधिकारी संखे म्याडम यांना ही बाब लक्ष्यात आणून द्यावी लागली आता या पुढे कोणत्याही शाळेत असे प्रकार घडले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील बऱ्याच शाळेची मुजोरी चालू आहे अश्या शाळेवर कारवाही व्हावी अशी मागणी अनेक ही पालकातर्फ़े होत आहे. पालकांशी संवाद साधला आसता बऱ्याच पालकांनी विजय साळे यांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here