मालेगाव: क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_ प्र्रतिनिधीी _ मालेगावात पहिल्यांदाच राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कवयित्रींच्या भावस्पर्शी कवितांनी मैफल रंगली.
जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघातर्फे कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्र सेवा दल अभ्यासिकेत कवयित्री संमेलन रंगतदार झाले. संमेलनाचे उदघाटन जिजाऊ बिग्रेडच्या जिल्हाध्यक्ष शिल्पा देशमुख यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्र सेवा दल राज्य सदस्य स्वाती वाणी, बांधकाम व्यावसायिक निलीमा पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कविसंमेलनात जिजाऊंच्या गौरवासह अनेक सामाजिक, ह्दयाच्या ठाव घेणा-या कविता सादर झाल्या. कवयित्री विजयालक्ष्मी अहिरे, प्रतिभा बोरसे, लता सुर्यवंशी, मनिषा सावळे,ज्ञविजया भदाणे, वैशाली भामरे, नुतन चौधरी, छाया पाटील, अवंती वाणी, क्षितीजा सोनार यांनी विविध कविता सादर केल्या.
अध्यक्षा खैरनार यांनी कविता कशी फुलते यावर भाष्य केले.
कवी राजेंद्र दिघे यांनी सुत्रसंचालन केले. चिमुकली सई पाटील हिने मनोगत व्यक्त केले. जगदीश खैरनार यांनी आभार मानले.
यावेळी साहित्यिक सुरेंद्र टिपरे, रमेश उचित, विवेक पाटील अनिल पाटील, नम्रता पगार, प्राजक्ता सोनार, मनिषा पाटील, कल्पना पाटील, वसंत अहिरे, वाल्मिक घरटे, विष्णू गुमाडे, राजू साळुंखे आदींसह रसिक उपस्थित होते.