मालेगाव : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ स्पेशल रिपोर्ट _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका नेहमीच कुठल्याही घटनांच्या बाबतीत आघाडीवर असतोच त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक , जिल्हा पोलिस अधीक्षक तर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मालेगाव आणि मालेगाव तालुक्यातील घडामोडींकडे जातीने लक्ष ठेवावे लागते. असे असून सुद्धा मालेगाव तालुक्या स 2020 ह्या वर्षाने लक्ष्य केलेच . सद्या महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणुका लागल्याने मालेगाव तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सुद्धा निवडणुका लागल्या आहेत त्यात तळवाडे गावची ग्राम पंचायतीची सुद्धा निवडणूक असल्याने आदर्श आचार संहिता सुरू आहे अशातच दि.३१ डिसेंबर 2020 रोजी सकाळी साडेनऊ ( ९.३० ) वा. तालुक्यातील तळवाडे गावी प्राणघातक हल्ला करून कुंवर कुटुंबातील एक महिला व दोन पुरुषांना ठार मारण्याचा प्रकार घडला ,तर आदर्श आचार संहितेचा सुद्धा भंग झाल्याचे यानिमित्ताने उघड झाले याबाबत वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाहिजे तशी दखल वडनेर खाकुर्डी पोलिसानं कडून घेतली गेली नसल्याने आरोपींना अटक न ,त्याचेवर कठोर कारवाई न करता आरोपी मोकाटच असल्याने कुंवर कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती फिर्यादी पुष्कराज बाळासाहेब कुंवर याने क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज” वेब चॅनल शी बोलतांना सांगितले.याबाबत सविस्तर समजलेली हकिकत अशी की,वरील तारखेस फिर्यादी चा भाऊ कल्पराज कुंवर हा कांदे लावण्या साठी शेत बांधत असताना आरोपी महेंद्र केदा उर्फ बापू पवार ,किशोर केदा उर्फ बापू पवार,बिबाबाई केदा उर्फ बापू पवार हे कुंवर यांच्या शेतात आले आणि ” बांधाच्या ” कारण वरून कुरापत काढून फिर्यादी च्या भावास शिवीगाळ,दमदाटी करत होते म्हणून फिर्यादी चे वडील बाळासाहेब कोंडाजी कुंवर आरोपींना समजाऊन सांगत असताना त्याचा राग आरोपीस यांना येऊन आरोपी किशोर पवार याने हातातील दगड बाळासाहेब कुंवर यांच्या डोक्यावर जोराने फेकला त्यामुळे बाळासाहेब यांच्या डोक्यास दगडाचा मार लागून डोके फाटले ( फुटले) म्हणून बाळासाहेब जमिनीवर कोसळले तर फिर्यादी ची आई विजया कुंवर यांना सुद्धा आरोपी बीबाबाई केदा उर्फ बापू पवार हिने सुद्धा स्वतःच्या हातातील दगड विजया कुंवर यांना जोराने मारून विजया यांचे डोके फोडले तर फिर्यादी चे आजोबा कोंडाजी पर्वत कुंवर यांना आरोपी महेंद्र पवार व किशोर पवार यांनी जोराने धरपकड करीत असताना विहिरी जवळील गज डोक्यास लागून डोके फाटले ( फोडले ) आणि तुमचा बेतच पाहतो अशी धमकी देत शिवीगाळ सुरू ठेवली त्यामुळे पुष्कराज बाळासाहेब कुंवर,( वय १९) याने मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली असून भा.द. वि. क.324 ,337,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा.पो.निरीक्षक रामेश्वर साहेब यांचे मार्गर्शनाखाली पो.ना आर.जी.पारधी करत आहेत प्राण घातक हल्ला करून ही मात्र आरोपी मोकाट फिरत असून त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही उलट आरोपींचे धाडस वाढले असून त्यांनी आरोपीस फिर्याद मागे घे नाहीतर तुम्ही तळवाडे गावी शिवारात जिवंत कसे राहणार ? तुम्हास मारून टाकू अश्या धमक्या देत असल्याचे पुष्कराज कुंवर याने सांगितले .कुंवर हे अनुसूचित जमाती मधील असून आरोपी कायम त्रास देत असतात त्यामुळेच वरील जीवघेणा प्रकार आरोपींनी केला असून आता धमकी देणे चालू केले असल्याने भयानक प्रकार घडल्याची दाट शक्यता असल्याने आरोपींना तात्काळ अटक होऊन त्यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी कुंवर कुटुंबीयांनी केली आहे तर वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक न करता त्यांना अभय देण्याचे काय कारण ? जर कुंवर कुटुंबीयांचे बरे वाईट झाले तर वडनेर खा चे पोलिस आणि पोलिस अधिकारी जबाबदारी घेणार काय ? असा सवाल जखमी कोंडाजी कुंवर ,बाळासाहेब कुंवर आणि विजया कुंवर यांनी सहा.पो.निरीक्षक रामेश्वर मोताले यांना केला असून ह्या घटनेचे गांभीर्य समजून मुख्यमंत्री महोदय,महाराष्ट्र राज्य,गृह मंत्री,महाराष्ट्र राज्य, आणि जील्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी – विशेष पोलीस महानिरीक्षक – नासिक, अपर जिल्हाधिकारी , मालेगाव, पोलिस अधीक्षक नासिक,अपर पोलिस अधीक्षक , मालेगाव आदींनी वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन आम्हास पोलिस संरक्षण देऊन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी कुंवर कुटुंबीयांनी केली आहे.