पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख गुन्हेगारांचे कर्दनकाळ ,जिल्ह्यात “अभिनव” उपक्रम राबवून हटवला करोणा काळ, अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करून भेट देताना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रमोद अहिरे..शोभाताई बल्लाळ

0
101

नाशिक : क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “_ भारत पवार यांज कडून  विशेष _ कोल्हापूर जिल्ह्यातून पुण्यात बदलून आलेले डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पदी पदभार हाती घेताच  करोणा मुक्त पुणे जिल्हा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध त्यांनी कायद्याचा बडगा उगारला जास्त गर्दीत जाऊ नये ,तोंडास मास्क लावून च घरा बाहेर पडावे,sanitaizr किवा साबणाने हात स्वच्छ धुण्याचे सांगताना ह्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल असे बजावताना अनेकांनी नियम काटेकोर पने पाळल्याने अगदी काही दिवसातच पुण्यात व जिल्ह्यात असलेला करोणा “काळ “च गायब झाल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. पोलिस तुमच्या ( जनते )साठी  हे ब्रीवाक्य खरे करण्या साठी डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात “अभिनव”उपक्रम राबवून जिल्हा भय मुक्त करून ,महिलांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य देणार ,पुण्यात असलेली गुन्हेगारी मोडीत काढून ” भय मुक्त पुणे जिल्हा,सुरक्षित पुणे जिल्हा ” मी माझ्या कारकिर्दीत करणार असल्याचे डॉ.देशमुख यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.”पुणे तेथे काय उणे ? “काहीच उणे नसणार इतकी सुरक्षितता आपण जिल्ह्यातील जनतेस ,महिलांना देणार असून  ” पोलिस जनते साठी ” हा उपक्रम जनहित साठी असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक पदी विराजमान असताना भल्या भल्या गुंडांना पाणी पाजले तर 2016 ते 2018 पर्यंत गडचिरोली ह्या नक्षलवादी जिल्ह्यात सुद्धा जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून धुरा सांभाळणारे डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांना पाणी पाजले अर्थात ” गुंडांचा कर्दनकाळ ” म्हणून डॉ.अभिनव देशमुख यांचे नाव घेतले जाते.गडचिरोली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही अशा कर्तव्यनिष्ठ , पाण्या सारखे निर्मळ असणाऱ्या डॉ.अभिनव देशमुख यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने ” आंतरिक सुरक्षा सेवा पदक “बहाल केले .हे पोलिस दलातील सर्वोच्च पदक नक्षलग्रस्त भागात ” कौतुकास्पद ” कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यास केंद शासनातर्फे बहाल केले जाते.तर खात्यातील हप्ते खोर पोलिसांवर त्यांनी कडग कारवाई करून जिल्ह्यात पोलीस आणि अधिकारी यांच्यावर वचक बसविला होता.त्यामुळे वरील जिल्ह्यातील गुंडगिरी,अवैध धंदे ,वाळू माफिया यांसारखे गुन्हेगारी मोडीत काढून टाकली होती त्यामुळे तेथील जनतेत ,विशेषतः महिलांमध्ये आदराचे स्थान म्हणून डॉ.अभिनव देशमुख यांचे कडे पाहिले जायचे.त्यामुळे महिला तेथील नागरिक भय मुक्त वातावरणात वावरत होते. तीच पद्घत आपण पुणे जिल्ह्यातील जनतेत वापरून ” भय मुक्त पुणे,सुरक्षित पुणे ” ,शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे ” असेच उपक्रम राबवून नागरिकांत आणि पोलिसात ऐक विश्वासाचे नाते निर्माण करू असेही डॉ.अभिनव देशमुख यांनी यावेळी सांगितले. अशा विश्वासू , कर्तवयनिष्ठ अधिकारी डॉ.देशमुख यांनी पुण्यात येऊन पुणे जिल्हा अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेताच करोना काळात अतिशय उत्कृष्ट काम केल्या बद्द्ल आणि कोल्हापूरला असताना गुन्हेगारांना वठणीवर  आननारे डॉ.देशमुख यांची थोडक्यात माहिती तयार करून त्यांना भेट स्वरुपात देऊन त्यांचा सन्मान करणारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी प्रमोद अहिरे , राष्ट्रीय संघटक शोभाताई बल्लाळ , धनंजय सराटे , रवी सावंत ,मनोज दादा , अहिरे मॅडम आणि त्यांची कन्या यांनी भेट वस्तू दिली .तर पुणे जिल्हा अधीक्षक म्हणून डॉ. अभिनव देशमुख यांनी पदभार स्वीकारल्याने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष / संस्थापक मा. प्रदिप बाबा पाटील , मा.शोभाताई बल्लाळ, मा.प्रमोद केंद्रे – सचिव ओक्सिजन ग्रुप महाराष्ट्र , मा.रघुनाथ कुंवर (आर.पी.कुंवर ) _ राज्य पदाधिकारी,मालेगाव , मा.नरेश सुधागोनिवार _ नाशिक जिल्हा पदाधिकारी आणि भारत पवार _ संस्थापक / मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज ,वेब चॅनल आणि क स मा दे टाइम्स ( प्रिंट मीडिया) साप्ताहिक तथा  महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ,ओझर टाऊनशिप (नाशिक )  आदींनी आदरणीय डॉ.अभिनव देशमुख साहेबांचे अभिंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. * लेखक / शब्दांकन : भारत पवार ,मुख्य संपादक “महाराष्ट्र न्यूज ” तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती. मो.9158417131

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here