* भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरां च्या स्मारकाचे एक वर्षापासून रखडलेले काम ( छाया चित्रात दिसत आहे ), महाराष्ट्र न्यूज चित्र सेवा.
नवीमुंबई _ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _ मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी काल पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव या सर्वांसोबत एकत्रित पणे नवी मुंबईतील अनेक विकासकामांचा आढावा घेतला, त्याबद्दल त्यांचे मनसे मनापासून आभार व्यक्त करते.
परंतु नवी मुंबईकरांच्या मनातील प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दुर्लक्ष केले, याबद्दल जनतेत नाराजी पसरली आहे. नवी मुंबईत महाराष्ट्र भवन ची भव्य वस्तू असावी, अशी लाखो नवी मुंबईकरांची आणि ग्रामीण भागातील तरुणांची अपेक्षा आहे. नवी मुंबईत इतर राज्यांचे भवन असताना महाराष्ट्र भवन नसल्याबद्दल नवी मुंबईकरांमध्ये संतापाची भावना आहे. नवी मुंबईत अनेक ग्रामीण भागातील तरुण विविध प्रकारच्या परीक्षा देण्यासाठी मुंबईत येत असतात, पण त्यांच्या निवाऱ्याची कोणतीही सोया नसताना अनेकदा मराठी तरुण तरुणी रात्री रस्त्यावर झोपलेले दिसतात. महाराष्ट्रासाठी हि निश्चितच लाजिरवाणी बाब आहे. महाराष्ट्र भवनची वास्तू उभारल्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून, शहरी भागातून विविध कारणासाठी मुंबई, नवी मुंबईत तात्पुरत्या कारणासाठी येणाऱ्या माणसांची सोय होईल.
सिडकोने इतर राज्यांना भवन उभे करायला भूखंड दिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भवन साठी सुद्धा वाशी, सेक्टर-३०(अ) येथे महाराष्ट्र भवन साठी दोन एकर चा भूखंड राखीव ठेवला आहे. परंतु अनेक वर्षांपासून हा भूखंड मोकळाच आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आपल्या सरकारने वाशी मध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु गेल्या ९ महिन्यात या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.
नवी मुंबई ऐरोली, सेक्टर-१५, येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे अंतिम टप्प्यातील काम एक वर्षाहून जास्त काळापासून रखडलेले आहे. स्मारकाच्या घुमटाला संगमरवरी लाद्या लावण्याचे काम जास्त काळापासून रखडले आहे. या स्मारकाशी असंख्य लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. तसेच महामानवाच्या स्मारकाच्या कामात अशी दिरंगाई अनेक वर्षांपासून होणे हे नवी मुंबईकरांना न पटणारे आहे.
ऐरोली, सेक्टर-५ येथे बांधण्यात येणारे नाट्यगृह हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कार्यक्रमाचे जिवंत उदाहरण आहे. २०१४ साली पालिकेकडून नाट्यगृह बांधण्यासाठी एका ठेकेदाराला निविदा देण्यात आली. पण सध्या या ठिकाणी नाट्यगृहासाठी ठेकेदाराने काढलेल्या खड्ड्याचे तलावात रूपांतर झाले आहे. सहा वर्षांपासून या नाट्यगृहाचे काम रखडले आहे आणि कित्येक पटीने या कामाची किंमत वाढली आहे.
तरी मुख्यमंत्र्यांनी वाशी मधील महाराष्ट्र भवन, ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, ऐरोलीतील नाट्यगृह च्या रखडलेल्या कामामध्ये वैयक्तिक लक्ष घालावे आणि या तिन्ही कामांना गती द्यावी अशी विनंती मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन केली आहे.