नवी मुंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_राज्य सरकारसह नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने करोनाच्या बाबतीत विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत मात्र त्या नंतरही बेजबाबदारपणे वागून नियमाचे उल्लंघन केले जात आहे आणी असल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे त्या साठी रुपये ५०० ते रुपये २००० दंड वसूल केला जात आहे तरीही काही काही नागरिक मास्क वापरत नाही तर काही नागरिक घई गडबडीत मास्क घालायला विसरतात असल्या लोकांसाठी आम आदमी पार्टी तर्फे अनोख्या पद्धतीने जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांना मोफत मास्क वाटप करतानाच सामाजिक जबाबदारी व सुरक्षिततेची खबरदारी घेणारे ‘नवी मुंबईचे हिरो’ या ब्रीदवाक्या सह सेल्फी काढला जात आहे आणि या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे मात्र मास्क देताना नागरिकांना सामाजिक जबादारीची जाणीव करून दिली जात आहे. अश्याप्रकारे ‘आप’ कडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाद्वारे नवी मुंबई महानगरपालिकेला एक प्रकारें मदत होत आहे मास्क दिल्यानंतर तो परिधान करून सेल्फी काढण्यात येत आहे मुख्य म्हणजे नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत असून मास्क घालून सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आश्वासन नागरिक करत आहेत हे सर्व अभियान संपूर्ण नवी मुंबईत गर्दीच्या ठिकाणी राबविण्यात येत आहेत