ओझर टाऊनशिप येथील निवडणूक कामात बेजाबदारपणा , आतातरी उच्च अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणा , कामासाठी गेलेल्या व्यक्तीस उडवाउडवीची उत्तरे तर टाऊनशिप मधील अंगणवाडीतील सर्व कर्मचारी गायप , अती महत्वाच्या कामात असे चालते का ? _ भारत पवार

0
28

ओझर टाऊनशिप : क स मा दे” टाइम्स महाराष्ट्र न्यूज ” _स्पेशल रिपोर्ट _सध्या महाराष्ट्रात नवीन मतदार नोदणी कार्यक्रम जोरदार सुरू आहे ह्या कामात ढवळाढवळ किंवा हलगर्जी पणा , उडवाउडवीची उत्तरे किंवा जो कोणी मतदार मतदानाच्या महत्वाच्या कामानिमित्त ग्राम पालिकेत किंवा तलाठी कार्यालयात गेल्यास त्यास माघारी फिरविले जात नाही काम आहे त्याच कार्यालयात करून देणे टाळाटाळ नकोच असे आदेश सुद्धा उच्च पातळीवरील अधिकाऱ्यांचे संबधित अधिकारी व कर्मचारी यांना दिलेले असतात.या कामी नासिक जिल्ह्यात सुद्धा ही मोहीम सर्वत्र नवीन मतदार नोदणी करणे, नाव कमी करून दुसऱ्या मतदार संघाच्या यादीत समाविष्ट नाव करणे हि कामे अत्यंत जोमाने चालू आहेत असे असताना नासिक जिल्ह्यातील ,निफाड तालुक्यातील ओझर ग्राम पालिकेत काल चक्क किस्सा घडला की ओझर टाऊनशिप येथील एका मतदाराचे नाव टाऊनशिप मतदार यादीतून कमी करून नाव कमी करण्यात आल्याचा तसा दाखला देण्यात यावा अशी विनंती संबधित अधिकाऱ्यास मतदार कडील व्यक्तीने केली सदर व्यक्ती वयोवृध्द होती तरी सुद्धा त्या अधिकाऱ्याने सहकार्य न करता वरील दाखला टाऊनशिप च्या ” अंगणवाडीत ” भेटेल असे फर्मान सोडले अंगणवाडी कर्मचारी यांना तसा दाखला देण्याचा अधिकार आहे का ? हे सुध्दा तपासणे गरजेचे आहे.ती व्यक्ती काल तेथून परतून आली तर टाऊनशिप मध्ये अंगण वाडी आहे का ? तर नाही मग संबधित असे खोटे का बोलला याची चौकशी उच्च अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे . दाखला देणे जास्तीत जास्त दहा मिनिटांचे काम ? दहा मिनिट सुध्दा जास्त होतात तरी त्या ग्राम पालिकेत दाखला का दिला गेला नाही ? टाऊनशिप ची मतदार यादी ग्राम पालिकेत असणारच कारण यादी काही फक्त यकच छापली जात नाही मग कामात टाळाटाळ करून सदर व्यक्तीस परत/माघारी करणे यात त्या अधिकाऱ्यास मोठे शहाणपण वाटले असेल का? निवडणूक आयोगाच्य  कामात असे बेजबाबदार पणे वागणे हे नियमात आहे का असा संतप्त सवाल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व महाराष्ट्र न्यूज चनल संपादक भारत पवार यांनी केला असून टाळाटाळ आणि बेजबादार पणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना महत्वाच्या कामाची जाणीव करून देऊन त्यांचे भान ठिकाणावर राहील अशी तरतूद उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी करावी आणि कुठल्याही वार्डातील काम असो ते ग्राम पालिकेत आणि तलाठी कार्यालयात केली जावीत कोणीही व्यक्ती परत जाणार नाही असा आदेश त्वरित पारित करावा अशी मागणी सुद्धा संबधित निवडणूक अधिकारी , जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार,गटविकास अधिकारी यांचे कडे सदर निवेदनाद्वारे भारत पवार यांनी केली आहे. विशेष की टाऊन शिप ला अंगणवाडी तर नाहीच परंतु टाऊनशिप च्या अंगणवाडीत दाखला भेटेल असे सांगून मतदारास गोंधळात पाडणे हे चुकीचे असून कायद्याने गुन्हा आहे आणि तो मतदार  शेवटी अंगणवाडी शोधण्या साठी काल आणि आज सुध्दा टाऊनशिप लगत असलेल्या आंबेडकर नगरात गेला तेथील अंगणवाडी कर्मचारी स्थानिक मिळून आले नाही त्यामुळे नाव नोंदणी करणे काय किंवा मतदार यादीतून नाव कमी करून तसा दाखला मिळवणे काय दहा मिनिटाच्या कामास दोन दिवस लागले तरी काम झाले नाही यावरून कर्मचारी किती दक्ष आहेत ह्या कामात मतदारांना किती सहकार्य करतात ह्या कामाचे गांभीर्य किती त्या कर्मचाऱ्यांना आहे हे लक्षात घेण्यासारखे आहेच.त्यामुळे मतदार नाराज होतो काम सोडून उगीच चकर पडत असून  संताप व्यक्त केला जातो कोणी कुठे गावी गेला असेल तर त्या कर्मचाऱ्याच्य  ठिकाणी नवीन कर्मचारी उपलब्ध का केला नसेल ? मतदाराने इतर कामे सोडून हेलपाटे च मारत रहावे का ? त्यामुळे नाराजी पसरत असून  संबधित कर्मचाऱ्यांची तातडीने चौकशी होऊन त्या अंगणवाडीत कायम स्वरुपी ह्या कामा साठी पाच वाजेपर्यंत कर्मचारी नियुक्त करावा की तो त्या अंगणवाडीत कायम पाच वाजेपर्यंत तेथेच भेटेल अशीही मागणी पवार यांनी केली असून संबधित उच्च अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती दखल घेऊन कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावे असेही शेवटी पवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here