नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ राजू केदारे याज कडून _ गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खासगी व सिडकोनिर्मित्त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी ४ एफएसआयला तत्त्वत: मान्यता दिल्याचे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. पुनर्विकासासाठी सिडकोने चार एफएसआयचा प्रस्ताव तयार केला असून दोन दिवसांत तो राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
सिडकोने चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी यापूर्वीच्या सरकारने अडीच एफएसआय जाहीर केला होता. परंतु पुनर्विकासासाठी हा चटई निर्देशांक कमी असल्याने तो चार करावा, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी लावून धरली होती. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते.
आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हजारो रहिवाशांचे आपल्या इमारतीच्या पुनर्बांधणीचे स्वप्न साकार होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी अडीच एफएसआयला मंजुरी दिली होती. अडीच एफएसआय पुरेसा नसल्याने तो चार करावा, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
सिडकोने कशा प्रकारे ४ एफएसआय देता येऊ शकतो याचे नियोजन केले असून यासंबंधीचा अहवाल दोन दिवसांत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर चार एफएसआयच्या मागणीवर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला.
सिडको ने बांधलेल्या इमारती ची अल्पावधीतच पडझड सुरू झाली आहे. यातील बहुतांशी इमारती मोडकळीस आल्या असून महापालिकेने त्या धोकादायक घोषित केल्या आहेत. तसेच खासगी विकासकांनी बांधलेल्या इमारतींचीही दयनीय अवस्था
झाली आहे.तसेच वीस वर्षांपासून जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न रेंगाळला आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आताहा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचे आपल्या इमारतीच्या पुनर्बांधणीचे स्वप्न साकार होणार आहे.सिडकोच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास केल्यास नागरिकांना त्याचा अधिक फायदा होईल.