मुंबईत आरोग्य खात्याची अब्रू चव्हाट्यावर : कोवीड चाचणी किटचा गफला भोवला डॉ.सचिन नेमाने निलंबित झाला.मनसे शिष्ठ मंडळाचा दणका …

0
38

 

नवी मुंबई दि.28 – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी _ मुंबई महानगरपालिकेचा कोविड तपासणी घोटाळा.. मनसेच्या शिष्टमंडळ भेटीनंतर मनपा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन नेमाने यांचे तात्काळ निलंबन..

तसेच उपायुक्त योगेश कडुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदसीय समिती नेमणूक.

दोन आठवड्यात सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणार …. आयुक्तांचे मनसे शिष्टमंडळाला आश्वासन.

अनेक वृत्तवाहिन्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील कोविड चाचण्यांमध्ये असणारा घोटाळा उघड केला आहे. समजलेल्या माहिती प्रमाणे महानगरपालिके मध्ये जे नागरिक कोविड चाचणी करण्यास जातात, त्यांना त्यांच्या परिवारातील सदस्यांची नावे आणि इतर माहिती विचारली जाते. चाचणी केलेला सदस्य कोविड निगेटिव्ह असेल तर, त्याच्या परिवारातील इतर सदस्यांनी कोविड चाचणी केली नसताना देखील त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह दाखवले जातात. असा दावा एका तरुणाने पुराव्यानिशी केला आहे. त्याचप्रमाणे अशी कोविड चाचणी करताना एका तरुणाने तीन वर्षांपूर्वी मृत पावलेल्या आपल्या आईचे नाव परिवार सदस्य म्हणून दिले, तर त्याच्या आईचा हि कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

या विषयाबाबत मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. सदर बाब अत्यंत गंभीर आहे आणि प्रथमदर्शनी मोठा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. ज्या लोकांची चाचणीच होत नाही, त्यांची कोविड चाचणी किट चे नक्की हे अधिकारी काय करतात, याची सखोल चौकशी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेने आयुक्तांकडे केली.

मनसेच्या मागणीची दखल घेत मनपा आयुक्तांनी तात्काळ आरोग्य अधिकारी डॉ.सचिन नेमाने यांचे निलंबन केले. तसेच उपायुक्त योगेश कडुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदसिय समिती नेमणूक केली. हि समिती येत्या दोन आठवड्यात सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणार असे आश्वासन आयुक्तांनी मनसे शिष्टमंडळाला दिले. मनसेच्या या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव सचिन कदम, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, कामगार सेना शहर संघटक अप्पासाहेब कौठुळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, रोजगार शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, उप विभागअध्यक्ष श्याम कोळी हे उपस्थित होते.

*** पाहिजेत _” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल साठी _ नवीमुंबई,जुनी मुंबई,ठाणे,पालघर,दादर,कल्याण,विक्रोळी,घाटकोपर,मंत्रालय,उल्हास नगर,वाशी,मुलुंड,कासार,गोवंडी,चिमूर,पनवेल, रत्नागिरी,रायगड ,सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात _ पत्रकार,जाहिरात प्रतिनिधी , बूरोचिफ,विभागीय संपादक,उपसंपादक,सह संपादक,कार्यकारी संपादक तात्काळ नियुक्त करण्यात येत आहेत.तरी इच्छुक असणारे व जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनी च संपर्क करावा.संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल .मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here