*माळवाडी ता. देवळा-क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _प्रतिनिध -28 नोव्हेंबर हा महात्मा ज्योतीराव फुले यांची 130 वी पुण्यतिथी निमित्ताने माळवाडी गावात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.* समाजसुधारक महात्मा फुलेंनी संकटकाळात पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला होता. महाराष्टाचे आद्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांची पहीली जयंती साजरी केली असे अनेक उदाहरणे इतिहासात आहेत . भारत देश एकसंघ राहावा. संकटकाळात प्रत्येक भारतीय ऐक्याने राहतो हा वारसा जतन करणेसाठी आज जगभरात कोवीड 19 चा थैमान चालू असताना सिव्हील हाँस्पिटल नाशिक येथे रुग्णांना रक्त कमी पडू नये म्हणून रक्तदान करुन देशसेवा करावी व आम्ही भारतीय संकटांवर मात करणेस सज्ज आहोत हे दाखाविणेची वेळ आता आली आहे.आपणास नम्र निवेदन की आपल्या रक्ताचा एक थेंब दुस-याचा जीव वाचवू शकतो करीता आपण व आपल्यासोबत मित्रांनी रक्तदान खरावे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा वारसा कायम ठेवणेसाठी सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन जयराम सोनवणे , राजेश निकुुुंभ ं यांनी केले आहे. विि
28 नोव्हेंबर 1890 रोजी तात्यासाहेबांनी वयाच्या 63 व्या वर्षी आपला निरोप घेतला* 28 नोव्हेंबर 2020 रोजी बरोबर 130 वर्ष पुर्ण होत असून समाजात कौरोना चा थैमान चालु असताना आजारात रक्ताचा तुडवडा भासू नये ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी असून समाजाचे कायम देण लागतो ही भावना ठेवून नाशिक जिल्यातुन सिव्हील हाँस्पीटल नाशिक येथे परिसरांतून 130 रक्ताच्या बाँटल देवून रक्तदान करावे हा संकल्प सर्वांनी करु या. नाशिककर , देवळा तालूक्यातील तरुण मोठ्या प्रमाणात रक्तदान करणार आहेत. आपणही रक्त दानात 100% रक्तदान करणार करुन देशसेवा करण्याचा एक भाग बनावे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान* करणेसाठी आपण पुढे यावे महात्मा फुले कला व क्रीडा मंडळ माळवाडी ,फुलेमाळवाडी वासियांकडून आव्वाहन करणेत येत आहे. रक्तदान करणारे दानशुरास रक्तपेढीकडून प्रमाणपत्र व तात्यासाहेंबांचे लिखित *”शेतक-यांचे आसूड”* हे पूस्तक भेट देण्यात येईल.रक्तदान व्यक्ती ने स्वतः हून आपले नाव व मोबाईल नंबर द्यावा .