इचलकरंजी : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _ कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तालुक्यातील एस टी आगारातील काही अधिकाऱ्यांची हुकुमशाही एस टी कर्मचाऱ्यंसाठी घातक ठरणार असल्याचे अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांनी क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” ला दिलेल्या निवेदनात म्हटले असून यात कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की ,
मुंबई येथील बेस्टच्या मदतीसाठी कोल्हापूर विभागातुन इचलकरंजी आगारामधील 22 चालक 22 वाहक एकूण 44 एसटी कर्मचारी गेले होते.
मुंबईस पाठवताना प्रशासकीय प्रचलित नियम धाब्यावर बसवून , चढत्या क्रमाने ज्युनिअर कर्मचारी पाठवायचे असताना देखील आगारातील एका समूह गटातील कर्मचाऱ्यांच्या सगंनमताने ४४ कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय करण्यात आलाआहे.आलेल्या कर्मचाऱ्यांनी मागाणी करून ही कोरोना चाचणी कलेली नाही याची मा.जिल्हाधिकारी यांनी नोंद घ्यावी,
आपल्या अधिकार पदाचा गैर वापर करून कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने
मुंबई बेस्टच्या मदतीला पाठवले होते, मुंबईला जाण्यापूर्वी आगारातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांला निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे ही सांगण्यात आले होते.
इचलकरंजी आगारातील ४४ कर्मचारी जिवाची पर्वा न करता मुंबई येथे ड्युटीला गेले होते. परत आलेल्या कर्मचाऱ्यांचा इतर प्रवाशांशी थेट संबंध येत असुन त्यामुळे त्यांच्या नातेवाईक , तालुक्यात देखील कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई येथे गेलेल्या कर्मचाऱ्यांना नीट जेवनाची व्यवस्था देखील केली नव्हती .
गेल्या तिन महीन्यापासुन एसटी.कर्मचाऱ्यांचा पगार देखील झालेला नाही.
पण या सरकारला या कर्मचाऱ्यांचे कसलही सोयरं सुतक नाही.
सद्या मुंबईहुन सेवा बजावुन परत आलेल्या इचलकरंजी आगारातील तिन ते चार कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पाँझिटीव्ह आला असुन इतर चाळीस कर्मचाऱ्यां पैकी काहींचा अहवाल अजुन यायचा बाकी आहे , काही कर्मचारी भितीपोटी तपासणीसाठी गेलेले नाही,
पण मुंबईहून आलेल्या कर्मचाऱ्यांची साधी चौकशी सुद्धा आगारातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली नाही.
एखाद्या चुकीला कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी अधिकारी तातडीने कारवाई करत असतात पण जे कर्मचारी जीवाची बाजीलावून मुंबईहून परत आलै त्यांची साधी विचारपूस देखील केलेली नाही.
याची खंत इचलकरंजी आगारातील कर्मचाऱ्यांना वाटत आहे.
आधीच तिन महीने झाले पगार नाही,
कुठूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे ,
त्यातच मुंबईहून आलेल्यांना कोरोनाने हैराण केले आहे.
कर्मचाऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर असे जगावे कि मरावे
झाले आहे.