ओझर टाऊनशिप : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_भारत पवार याज कडून – महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गेल्या सहा/ सात महन्यांपूर्वी कोरोना विषानुंने अर्थात महामारिने अगदी थैमान मांडले होते यात जिल्ह्यातील ओझर येथील सुवर्ण जुबली ठरलेली एच. ए. ए एल.कंपनीतील अधिकारी,कामगार आणि हॉस्पिटल मधील काही कर्मचारी यांना सुद्धा कोरोनाने घेरले होते इतके की भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती अशा परिस्थतीमध्ये एच. ए.एल.हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर्स आणि सर्व नर्सेस योद्यानी फॅमिली चा विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक कोरोना पेशंट चांगले करून त्यांचा जीव वाचवण्यासाठी इतिहास रचला आणि खरोखर एक युद्ध जिंकल्याचा आनंद आम्हास आहे अहो ह्या विषाणू ने लाखोंचे बळी गेले त्यात डॉक्टर्स,नर्सेस सुद्धा मेले इतरांचे तर विचारूच नका हे शहाण्यांना सांगण्याची गरज नाही, हि महामारी इतकी भयानक आहे की स्वतःचे कितीही जवळचे नाते संबंध असू देत मग पत्नी असो की पती असो की मुलगा असो एकमेकांना भेटणे म्हणजे स्वतः मृत्युला कवटाळणे असे आहे म्हणून जवळच जाता येत नाही मग विचार करा एक वेळा डॉक्टर सुद्धा पेशंटला दुरूनच पाहून थंड होतो परंतु यात खरे मरण सिस्टर / नर्सेस यांचेच आहे.कारण डॉक्टर ट्रीटमेंट लिहून देतात पण खरा उपचार करणारे नेसेस असतात पेशंट positive असला तरी नर्सेस ला किट घालून आठ तास त्या पेशंटला उपचारा साठी कडवी झुंज द्यावी लागते मग आठ तासात त्या नर्सेस ला तहान लागली तरी पाणी पिता येत नाही, लघु शंके साठी जाता येत नाही उलट त्या किट मुळे घामाच्या धारा वाहू लागतात जसे जिवंत पणी मरण यातना ह्या सिस्टर / नर्सेस यांना सोसावे लागतात खरचं एच ए एल च्या सर्व नर्सेस ह्या कोरोना योद्धा / वॉरियर्स म्हणून स्त्करास / कौतुकास पात्र आहेतच परंतु नर्सेस चे काम पाहून महामारी ची चिंता न करता स्वतःची फॅमिली,लहान मूल यांचा विचार न करता स्वतःचा जीव प्यारी / प्रिय असून सुद्धा विचार न करता कोरोना पेशंटला उपचार करून जीव वाचवण्यासाठी जो प्रयत्न केला आहे तो खूप काही महान आहे की प्रत्येक नर्सेस ला कसलाही नियम व अटी न लावता त्यांचे प्रमोशन करणे गरजेचे आहे इतके की ह्या महामारी पुढे त्यांचे प्रमोशन सुद्धा फिके आहे इतका जीव घेणारा, बळी घेणारा आजार नव्हे रोगच आहे . परंतु दुर्दैव असे की इतकी कडवी झुंज देऊन सुद्धा आणि आजही देत आहेत इतकं ज्वलंत असून सुद्धा येथील कामगार युनियनने साधी दखल घेतली नाही की आपल्या च हॉस्पिटलच्या नर्सेस आपणास ,आपल्या आई – वडिलांना ,आपल्या मुलास वा पत्नीस उपचार करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवदान देतात आणि आपण त्यांचा युनियन तर्फे साधा स्त्कार ठेऊ शकत नाही नका ठेऊ त्यांच्या कर्तव्याची जाणीव उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना करून देऊन नर्सेस एक ज्यादा प्रमोशन मिळून देण्या साठी प्रयत्न करू शकत नाही याशिवाय दुसरी दुर्देवी गोष्ट कोणती ? हेच अधिकाऱ्यांनी सुद्धा समजून घेतले पाहिजे की नर्सेस चे कार्य किती महान आहे की आपणास संजीवनी / जीवदान देतात तर कर्मचारी वर्गा पेक्षा सिस्टर / नर्सेस ना सवलती जास्त दिल्या गेल्या पाहिजेत म्हणजे नर्सेस ना त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळेल त्यांना त्यांच्या कामाचे समाधान मिळेल हे होणे गरजेचे आहे आणि आता तरी जी एम , ए जी एम आणि कामगार युनियन यांनी दखल घेऊन नर्सेस ना त्यांच्या कार्याची पावती मोकळ्या मनाने बहाल करावी आणि त्यांच्या कार्यातील / कामातील नवसंजीवनी कायम टिकविण्यासाठी हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व डॉक्टर्स ,सर्व नर्सेस कोरोना योध्याना मी सलाम करून माझ्या” महाराष्ट्र न्यूज ” ह्या वेब चॅनल तर्फे तसेच ” क स मा दे टाइम्स ” प्रिंट मीडिया ( वृत्तपत्र ) तर्फे सर्व योध्यांचे खूप , खूप अभिनंदन करतो आणि पुनश्च आशा बाळगतो आता तरी जागे व्हाल ,नर्सेस योध्यांना न्याय द्याल.
लेखक / शब्दांकन : भारत पवार ,मुख्य संपादक *महाराष्ट्र राज्य अध्यक्ष _ प्रेस पत्रकार,फोटो ग्रफर व नागरिक संरक्षण समिती, * नासिक जिल्हा कार्याध्क्ष – माहिती अधिकार का.महासंघ * महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष – अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती , मो.9158417131