वासोळ – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी प्रशांत गिरासे – वासोळ गावातील शेतकरी संकटात सापडला असून मोला महागाचे कांदा पिकाची लागवड करून शेतकरी मनास आगळ घालून कांदा पिकासाठी पाणी देऊ लागला आणि पीक जरा जोमात दिसू लागताच त्याच्यावर रोगाने घाला घातला त्यामुळे जोमात असलेले पीक कोमात जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी राजा मोठ्याच संकटात सापडला असल्याचे चित्र दिसत आहे तर दुकानात बियाण्याच्या किंमती वाढल्याने दुकानदार भाव खाऊ लागला आहे त्यामुळे क स मा दे तालुक्यातील संतप्त झाला आहे. अशीच वासोळ येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना मांडली कर्म कहाणी ‘
वासोळ (जि.नाशिक) : वासोळ, फुले नगर (ता.देवळा) परिसरात शेतकऱ्यांनी टाकलेले कांदा रोप अतिवृष्टी आणि मर बुरशी रोगामुळे खराब होत चालल्याने पुढील काळात कांदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यात कांदा बियाणांचा दर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दुप्पट-तिप्पट पैसे मोजूनही कांदा बियाणे मिळेनासे झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
गिरनाकाठच्या कळवन, लोहनेर, वासोळ, निंबोळा, , महाल पाटणे फुले नगर या भागात झालेल्या सततच्या पावसाने कांदा रोप धोक्यात आले असून पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.
कांदा रोपाच्या माना वाकड्या होणे, बुरशी लागणे, मुळे सडणे असे प्रकार होत आहेत. रोप वाचविण्यासाठी शेतकरी महागड्या खते, औषधी फवारणीचा वापर करत आहेत. मात्र, औषधाची मात्रा पूर्ण क्षमतेने लागू पडत नाही.
मागील वर्षी राज्यभर परतीच्या पावसाने कहर केल्याने म्हणावे तसे कांदा बीजोत्पादन झालेच नाही. त्यामुळे कांदा बियाणांचे दर वाढले. यंदाही तिच स्थिती आहे. तसेच यंदा खरीप कांदा लागवड वाया गेली. उन्हाळी कांदा लागवडीसाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. अनेकांनी महागडे कांदा बियाणे टाकले. यंदाही अतिपावसाने बियाणे सडले.सततच्या पावसाने कांदा व इतर खरीप पिकांची हानी झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षेवर पाणी फेरले आहे.
यंदा अतिपावसाने शेतातच बियाणे सडले. उगवलेले रोपही खराब होत आहे. त्यामुळे गाठी असलेले कांदा बियाणे संपल्याने शेतकऱ्यांना नवीन बियाण्यांसाठी धावपळ करावी लाागते असे शेतकरी महारू नारायणसिंग गिरासे याांनी सांगितले