उमराणे बाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशी सूनसूनाठ,शेतकरी संतप्त

0
45

 

उमराणे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज – प्रतिनिध –  घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन पर्यंत कांदा माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुसर्या दिवशीही व्यापारी सहभागी न झाल्याने कांदा लिलाव ठप्पच होते.परिणामी भाववाढीची अपेक्षा असतानाच व्यापार्यांवर शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली असुन शासनाने योग्य तोडगा काढुन लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत जवळपास सर्वच कांदा व्यापार्यांकडे शंभर ते दिडशे टन कांदा शेडमध्ये पडुन आहे. त्यामुळे तो माल निकाशी होईपर्यंत व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी होणार नसल्याची भुमिका घेतल्याने पुुढील आदेश येईपर्यंत लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.परंतु अद्यापही काही व्यापार्यांच्या माल निकाशी न झाल्याने शिवाय माल साठवणुक निर्बंध निर्णयावर तोडगा न निघाल्याने आज दुसर्या दिवशीही ( मंगळवार दि.२७ ) येथील लिलाव ठप्पच होते. परिणामी एकीकडे काही प्रमाणात शिल्लक असलेला उन्हाळी कांदा खराब होत असतानाच कांदा दरवाढ रोखण्यासाठी शासनाकडून निर्यातबंदी, कांदा आयात, प्राप्तीकर विभागाकडून चौकशी, माल साठवणुकीवर निर्बंध आदी अडचणी निर्माण करुन व्यापार्यांसह शेतकर्यांना वेठीस धरत असल्याने व्यापारी व शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here