मालेगाव -कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,निलेश कासार –
मालेगाव मनपाची स्थायी समितीची निवड नुकतीच संपन्न झाली असून स्थायी समिती सभापती पदी राजाराम जाधव यांची वर्णी लागल्याने शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक व कार्यकर्ते यांनी जोरदार दिवाळी साजरी केली कार्यकर्त्यात रमणारा ,अत्यंत गरीब आणि सगळ्यांना न्याय देणारा सभापती शिवसेनेस गवसला असल्याने प्रत्येक प्रभागातील कामांना न्याय जरूर मिळणार असल्याने कार्यकर्त्यांनी जाधव यांचे जल्लोषात स्वागत केले तर आपण सगळ्यांना योग्य न्याय देणार असल्याचे सभापती राजाराम जाधव यांनी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्युजशी बोलतांना सांगितले ,यावेळी कृषी मंत्री ना.दादाजी भुसे ,माजी उप महापौर सखाराम घोडके , विद्यमान उपमहापौर निलेश आहेर यांचेसह अनेकांनी अभिंनदनाचा वर्षाव केला.