ओझरटाऊनशिप – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “- प्रतिनिधी –
– गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकांची संपूर्णपणे नासाडी झालेली आहे.बाजरी, मका व नुकताच लावलेल्या कांदा बियाणे व कांदा पिकांचे अतोनात नुकसान झालेलं असल्याने राज्य शासनाने त्वरित पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई द्यावी. तसेच अति पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेत आहे,म्हनून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
राज्यात आघाडीचे सरकार आहे मात्र त्यांच्या आपआपसातील हेवेदावे,कुरबुरीमुळे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी यांनी मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले.शेतकरी पिकवतील तेव्हाच आपण जगणार हे मात्र सरकार विसरत आहे.शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही,तशातच अति पावसामुळे त्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे ,या अस्मानी संकटात ते सापडलेले आहेत मात्र शासन शेतकऱ्यांकडे डोळेझाक करत आहे.शेतकऱ्यांचे हे दुष्टचक्र थांबले पाहिजे यासाठी राज्यशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना जगविले पाहिजे.
शेतकरी यांना आर्थिक उभारी देऊन मजुरांनापन रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. कोरोना महामारी मुळे संपूर्ण देश व राज्यात मजूर,कारागीर यांना काम नसल्यामुळे त्यांची उपासमार चालू आहे, याकडेही शासनाने लक्ष दिले पाहिजे.
या सर्व शेतकरी, मजूर व कारागीर यांना शासनाने भरिव मदत केली पाहिजे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पक्षाध्यक्ष ना.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली बागलाण तालुक्यात “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ” बागलाण तालुका व सटाणा शहर यांच्या तर्फे लवकरच जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे बागलाण तालुका RPI अध्यक्ष बापुराज खरे यांनी
सांगितले.