ब्राम्हणगाव : कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” – बापुराज खरे – यांज कडून –
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका हा पूर्वीचा दलित पँथर या संघटनेचा बालेकिल्ला असून तालुक्यात रिपब्लिकन पक्षाध्यक्ष ना.रामदासजी आठवले साहेब यांना मानणारा मोठा वर्ग असून तालुक्यात रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद असून ,तालुक्यातील प्रत्येक गावात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्ष कार्यात सामावून घेण्यासाठी तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तिथे रिपब्लिकन पक्षाच्या शाखा स्थापन अभियान कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बापुराज खरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
या शाखा स्थापन अभियान कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात पक्षाचा फलक स्थापन करून प्रत्येक गावात नवीन शाखा कार्यकारिणीची निवड करून त्यांना कामाची जबाबदारी वाटप करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक गावात पक्षाचे ध्येय धोरण व शासकीय योजनांची माहिती व पक्ष संघटनेत सर्वांना सामावून घेण्यासाठी पक्षाचे प्राथमिक व क्रियाशील सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे . व याबाबतची सर्व माहिती देण्यात येणार आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडा वस्तीनवर ना.आठवले साहेबांच्या स्वप्नातील विकास व जिल्हाप्रमुख मा.प्रकाशजी लोंढे रिप ब्लिकन चळवळीतील आंदोलन , या विकासात्मक व संकल्पना यावेळी नागरिकांना समजावून सांगण्यात येतील. या शाखा स्थापन अभियान कार्यक्रम राबविण्यासाठी लवकरच मा.जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्यातील पक्षाचे जेष्ठ नेते,पदाधिकारी व शाखा पदाधिकारी,शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सटाणा येथे लवकरच महाबैठक आयोजित करण्यात येणार आहे,असेही तालुका अध्यक्ष बापुराज खरे यांनी माहिती दिली आहे.तर
बागलाण तालुक्यातील असलेली मनमानी कारभार, हुकूमशाही हद्दपार करून त्यांना रस्ता दाखविणार गाव तिथे शाखा लवकरच अभियान राबविण्यात येऊन जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोंढे ( बॉस) यांना बागलाण मध्ये नकीच आणू आणि आर.पी. आय.ची बुलंद तोफ येथे गाजविणार असे खरे यांनी सांगितले .
**, पाहिजेत —
कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ‘ साठी महाराष्ट्र मधील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात,महानगरात ” पत्रकार ‘ नियुक्त करणें आहेत :
इच्छित असणाऱ्यांनी संपर्क करावा – भारतराज पवार, मुख्य संपादक,कटा ” महाराष्ट्र न्यूज”
मो. 9158417131