बागलाण चे नाव देश पातळीवर नेले,सोपान खैरणार राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित झाले

0
39

 

वासोळं -कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रशांत गिरासे
सटाणा:- तालुक्यातील मोरेनगर येथील आय.एस.ओ मानांकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सोपान खैरनार यांना भारतीय प्रबंध संस्थान (IIM), रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन ऑफ रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) सोलापूर यांच्यातर्फे राष्ट्रीय इनोव्हेशन २०२०हा राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे बागलाणचे नाव पुन्हा देशपातळीवर उंचावले आहे. बागलाण पंचायत समितीतर्फे गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे यांच्या हस्ते श्री.खैरनार यांचा पुरस्काराबद्दल गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना गणित विषय अधिकाधिक मनोरंजक आणि आनंददायी होण्यासाठी उपक्रमशील शिक्षक सोपान खैरनार यांनी ‘आधार कार्ड आमचा मित्र’ हा नवोपक्रम शाळेत यशस्वीपणे राबवला आहे.
याचबरोबर ग्रामीण भागातील तळागाळात असलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी श्री. खैरणार वर्षभरात विविध उपक्रम घेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी तर वाढलीच शिवाय त्यांचा शैक्षणिक स्तरही उंचावला आहे. या एकूणच सर्व कार्याची दखल घेत भारतीय प्रबंध संस्थान, रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन अहमदाबाद, सर फाउंडेशन तसेच राज्याच्या शिक्षण विभागाच्या एज्युकेशन इनोव्हेशन बँक या प्रकल्पाअंतर्गत खैरनार यांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या ‘राष्ट्रीय इनोव्हेशन’ पुरस्काराचे वितरण होणार आहे.
त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्राद्वारे श्री.खैरनार यांचे अभिनंदन केले आहे. तर बागलाण पंचायत समितीतर्फे गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला. श्री.खैरणार यांनी शिक्षण क्षेत्रात बागलाण तालुक्याचे नाव उंचावल्याचेही श्री.कोल्हे यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी एस.आर. काथेपुरी, गटशिक्षणाधिकारी टी.के.घोंगडे, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास पगार, विजय पगार, केंद्रप्रमुख एम.एस.भामरे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here