वासोळं -कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रशांत गिरासे
-भारतीय जनता पक्षाचे खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाने आप्पाश्री मंगल कार्यालय , मोरेनगर, सटाणा येथे झालेल्या पद प्रदान सोहळ्यात मालेगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश नाना निकम, जिल्हा उपाध्यक्ष समाधान दादा हिरे, जिल्हा सरचिटणीस सुरेश नाना सोनवणे, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष सुरेश मोरे यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले युवा मंच आॅल इडीयाचे महासचिव नरेंद्र शिवाजी बागुल यांची ओबीसी सेलच्या मालेगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर बागुल यांच्यासह नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकारीत अनु.जा. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भारत निरभवणे, ओबीसी सेल जिल्हा प्रवक्त्या किशोर कोठावदे, ओबीसी सेल जिल्हा चिटणीस नंदु चौधरी, ओबीसी सेल बागलाण तालुका उपाध्यक्ष पंकज मोरे, ठेंगोडा गट प्रमुख नितीन वाघ, ठेंगोडा गण प्रमुख भारत धनवटे तर मुंजवाड गण प्रमुख पदी नाना सुर्यवंशी यांचा समावेश आहे.
पदाधिकारी निवडी प्रसंगी ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष सुरेश मोरे यांनी नवनिर्वाचितां कडुन आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारांनुसार पुढील काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व घटकांतील समाजासाठी भरीव कार्य कराल व टँकर्स संघटना मजबूतीने उभी कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सोहळ्याप्रसंगी बागलाण तालुका अध्यक्ष संजय माऊली देवरे, आदिवासी जिल्हा विकास अध्यक्ष पोपटी अहिरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश पाकळे, जेष्ठ नेते अशोक दादा गुंजाळ,जि.प.सदस्या मिनाताई मोरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंगेश खैरनार, बागलाण तालुका प्रवक्ता जीवन सोनवणे, तालुका उपाध्यक्ष संदीप पवार, कृष्णा माऊली, गोरख बच्छाव व राकेश घोडे, दिलीप खैरनार डॉ. पप्पु पवार, रूपाली पंडित, रेणु शर्मा व भाजपा जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.