मा.केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार व ना.छगन भुजबळ यांचेशी संबंध घनिष्ठ ,तरीही डॉ.संदीप पाटील नाही गर्विष्ठ…! मालेगावचे डॉ.संदीप पाटील यांचे पाय जमिनीवरच ..तर मालेगावी कोरोना पेशंट ची हेळसांड झाली कशी …?

0
43

डॉ.संदीप पाटील ( मालेगाव,नासिक)हे माजी केंद्रीयकृषी मंत्री,खा.शरद पवार यांचेशी हितगुज करतांना.

नासिक :भारतराज पवार , कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” नासिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डॉ.संदीप पाटील यांचे कार्य मी गेली पाच वर्षांपासून जवळून पाहतोय ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मालेगाव तालुका अध्यक्ष ( डॉ.सेल) सुध्दा आहेत .डॉक्टर व्यवसाय सांभाळून अविहत पणे समाज कार्य करत असतात गेल्या सात महिन्यांपासून कोरोना महामारीने मालेगाव आणि तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा हैदोस घातला आणि चालू आहे असे असताना ह्या महामारीत डॉक्टर पाटील यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील दाभाडी , रावळगाव आणि परिसरातील कोरोना पेशंट साठी फ्री मध्ये सेवा दिली . हे विशेष. डॉ.पाटील यांचे रावळगाव येथे लहानसे क्लिनिक आहे त्यात ते पेशंटना सेवा देतात म्हणताना व्यक्ती लहान त्याचे गुण महान असे असावे लागते. त्याप्रमाणेच डॉ.पाटील यांचे कार्य अविरत पणे आजही सुरू आहे.

त्यांच्या रक्तातील गुण म्हणजे पेशंट ला होईल तेवढ्या कमी खर्चात गुण देणे हा आहे आज नासिक ,मालेगाव मधील अनेक खाजगी डॉक्टरांनी ” कोरोना महामारी ” मुळे स्वतःचे ” पोट कल्याण ” करून घेतले आणि आज सुध्दा कल्याण करतच आहे की ” मृत्यूचे टाळू वरील लोणी ” खाण्याचा प्रकार सर्रास पणे चालू आहे इतके की मालेगाव सारख्या ठिकाणी ” सहारा ” असून तेथे सहाराच मिळत नाही सारे पद्धतशीर पणे कोरोना पेशंट कडे दुर्लक्ष केले जाते आहे .त्याचे असे मालेगाव महानगर पालिकेच्या अधिपत्याखाली सहारा नावाच्या हॉस्पिटलमध्ये ” कोरोना ” चे अगदी चालते बोलते पेशंट ऍडमिट केले जातात आणि 4/5 दिवसांत त्या पेशंटने तेथे ” दम ” तोडलाच पाहिजे असे अनेक पेशंट गेल्या काही दिवसांत मरण पावले हे सत्य नाकारून चालनार नाही . मग आज तागायत जे पेशंट मेले त्यांच्या वारसांना मनपा कडून भरपाई आणि त्या मरण पावलेल्या पेशंटच्या मुलास नोकरी  दिली गेली पाहिजे ही काळा ची गरज आहे याबाबत आहे का कोणी दयावाण पुतळा ? हा प्रश्न च आहे .कोरोना हा काय खूप भयानक आजार नाही तो भयानक बनवला गेलाय ? मग आर्थिक आमिष म्हणा किंवा कोणी राजकीय व्यक्तीचा दबाव म्हणा ? मात्र पेशंट ला पाहिजे तो उपचार तात्काळ दिला जात नाही पेशंट ला लवकर ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे पेशंट गुदमरते आणि मग … अशी अवस्था मालेगाव व परिसरातील कोरोना रुग्णांची होते , लिखाण करायला वाईट वाटते एवढी भयानक अवस्था सहारा कोविड ची झाली  अहो चक्क सहाराचे व्हेंटिलेटर लोटस ह्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जातात ,हे कसे काय गेले ? कोणाच्या सांगण्या वरून सहारा च्या मुख्यडॉक्टरांनी सहारा घेतला आणि व्हेंटिलेटर लोटस कडे लोटली आणि पेशंट ची हेळसांड केली गेली लोटस आणि सहारा च्या कारभारा बाबत वृत्तपत्रातून  धिंड ( बातम्या) सुद्धा काढली गेली लोटस ला  काय भीक लागली होती ? की  सहारा मध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटच्या जीवावर लोट्सच्या डॉ.शशिकांत हिरे यांना उठावे  लागले ? त्याकाळी सहारा मधील कोरोना पेशंट मेले याची जबाबदारी आता ते घेतील काय ? मालेगाव मनपाचे आयुक आणि उपायुक्त घेतील काय ? कारण यास जबाबदार हे अधिकारी पण आहेत सहारा चे पेशंट का मरताय ? याबाबत ह्या दोघा अधिकाऱ्यांनी लक्ष घातले असते तर सहारा हा पेशंट साठी नक्कीच सहारा झाला असता !कुठेतरी कर्तव्यात कसूर म्हणा किंवा मिलीभगत म्हणा ? पेशंट जीवानिशी गेलेत त्यांचे काय ? त्यांच्या वारसांचे काय ? ह्या प्रश्नांची उत्तरं मनपा आणि लोटस चे डॉक्टर देणार काय ? पेशंट साठी सहारा असलेल्या ” बेसहारा ” केलेल्या ? कोविड सेंटर कडे मालेगाव आणि परिसरातील नागरिक भयभीत झाल्याचेही याघटनेवरून दिसते .ईथे एवढं सांगायचा उद्देश असा की डॉक्टर पाटील मूर्ती लहान पण महान आहे .हसर व्यक्तिमत्त्व लोणी खाणारे नाहीत की टीप / कमिशन वरती धंदा करणारे नाहीत डॉक्टर पेशाला शोभणारी असली व्यक्ती आहे .रुग्णाची सेवा करत असताना समाज सेवेची व्रत सुद्धा त्यांनी हाती घेतले आहे. गेली 5 ते 10 वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेल चे तालुका अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत अनेकांच्या कामा निमित्ताने डॉ.देशाचे माजी कृषी मंत्री ,खा.शरद पवार आणि सद्या  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नासिक चे पालक मंत्री ना.छगन भुजबळ यांचेशी अगदी कायम जवळच असतात ,नागरिकांचे कामे करून आणतात तरीही पाटील डॉक्टरांचे पाय जमिनीवरच असतात कायम मित्रांशी संबंध ठेवतात गरीब असला तर त्याच्या हाकेला नक्कीच धावून जातात.त्यांनी पैशाची कधीच अभिलाषा बाळगली नाही त्यामुळे अनेक गरीब डॉक्टर पाटील यांच्या सोबत आहेत तरीही डॉक्टर संदीप पाटील म्हणतात आपण राजकारण नाही करणार अखंड जनसेवेत रमणार ती ही आज निस्वार्थी पणे आहे ती कायम निस्वार्थीच ठेवणार .आणि गरिबांना तारणार ….! यातच त्यांच्यातील मोठेपणा आणि ते आज करत असलेली जनसेवा,रुग्ण सेवा बरेच काही सांगून जाते ……

— लेखन / शब्दांकन : भारतराज पवार .

***         ****

**** नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क करा —

कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी — महाराष्ट्रातील मुबंई ,नवी मुंबई, ठाणे,घाटकोपर, कल्याण,विक्रोळी, दादर आणि सर्व जिल्ह्यात , सर्व तालुक्यात पत्रकार, प्रतिनिधी, जाहिरात प्रतिनिधी, तसेच कार्यकारी संपादक, उपसंपादक, विभागीय संपादक,वृत्तसंपादक, व्यवस्थापक नियुक्ती चालू आहे तरी इच्छित तरुण / तरुणी ,महिला – पुरुष आदीनी पत्रकार म्हणून काम करून आपल्या कमालीचा ठसा उंटविनाऱ्यांनी तात्काळ संपर्क करून संधीचे सोने करा .

संपर्क : * भारतराज पवार,मुख्यसंपादक ,कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” 9158417131

* अनिता पवार, व्यवस्थापीका ,7875163431

* रवींद्र बागुल – 830899633

* प्रमोद पवार – 9075137518

* प्रशांत गिरसे –  प्रतिनिधी – 9359228067

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here