बोल ग्रामसेवकांचे :आम्ही नाही कुणाच्या बापाचे ,खाऊन बसले काय त्या आदेशाचे ?अधिकाऱ्यांना कळतं काय, सरपंच आमचे हायफाय अधिकारी आमचे करतील काय ?त्यांच्या नादान पणा मुळे पत्रकार राजेंद्र पाटील यांनी दिला उपोषणाचा ईशारा

0
41

मालेगाव – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज”- ( भारत पवार ,यांज कडून ) – नको तिथे हुकुशाही करणारी कहाणी आहे महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील अनेक कारणांनी देशातच काय जगात गाजलेला तालुका ” मालेगाव ” येथील कौळाने आणि वऱ्हाणे गावातील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या हिटलरशाहीचा गेल्या वर्ष भरापूर्वी पत्रकार राजेंद्र पाटील-राऊत यांनी कौळाने येथील गावठाण जागा पत्रकार भावना साठी देण्यात यावी रितसर मागणी करून गावठाणजागा तत्कालीन सरपंच लताबाई बच्छाव व तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे यांनी कायदेशीर सोपस्कार करून प्रोसेडिंग बुक वरती नाव लावून कराची रक्कम वसूल करून  राऊत यांच्या ताब्यात दिली .सध्या सदरच्या सरपंचाची कारकीर्द संपुष्टात येऊन येथील ग्रामपंचायतीचा कारभारी म्हणून प्रशासनाने ” प्रशासकाची ” नियुक्ती केली.असे असताना सुद्धा घोंगडे नामक ग्रामसेवकाने कारभारी ( प्रशासक) ची मेहर नजर म्हणा की काय ? शासकीय दप्तर प्रोसेडिंग बुक तत्कालीन सरपंच च्या घरी नेऊन त्यात हिटलरशाही प्रमाणे खाडा खोड करून गावठाण जागा नामंजूर केली हा प्रकार राऊत यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही त्यांनी तात्काळ मालेगावच्या गटविकास अधिकारी यांचेशी संपर्क केला शासनाच्या ( जीआर)आदेशानुसार जागा देण्याचे फर्मान बीडीओ यांनी करून सुद्धा ग्रामसेवकाने आणि  तत्कालीन सरपंच यांनी आपला बालहट्ट दाखविण्यास सुरुवात केली तर असाच काहीसा चमत्कार वऱ्हाणे गावातील तत्कालीन सरपंच संगिता पवार व ग्रामसेविका सुवर्णा साळुंखे यांनी निराधार, विधवा महिला पत्रकार अल्का शांतीलाल बच्छाव यांचेशी केला .गावातील गावठाण जागा पाणपोई साठी गाजा वाजा करून साळुंखे यांनी उद्घाटन करून सरपंच यांचे उपस्थित जागा अल्का बच्छाव यांना दिली.काही दिवसांनी साळुंखे ह्या बच्छाव यांचे घरी जाऊन जागे संदर्भात ५0 ह.₹ घेऊन अलका बच्छाव यांचीअडवणूक करण्यास सुरुवात केल्याची माहिती राजेंद्र पाटील-राऊत यांनी आपल्या निवेदनात दिली.याबाबत अल्का बच्छाव यांनी गटविकास अधिकारी, मालेगाव यांनी तसा आदेश दिला आहे तर यावर साळुंखे म्हणाल्या ” आम्ही नाही कुणाच्या बापाचे,खाऊन बसले काय त्या आदेशाचे ? अशी उर्मट भाषा वापरून जिल्हाधिकारी यांचा आदेश आना असे सुनावले त्यामुळे त्रस्त होऊन वरील दोन्ही गावच्या सरपंच ,ग्रामसेवक यांच्या नादान पणा मुळे  आमरण उपोषणाला बसणार असा ईशारा पत्रकार राजेंद्र पाटील-राऊत यांनी देऊन कौळाने व वऱ्हाणे गावचे सरपंच ,ग्रामसेवक यांनी पैसे घेऊन सुध्दा शासकीय दप्तरात खाडा- खोड करणे व फसवणूक करणे याबत दोघा गावचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांचे विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करून दोघा गावचे सरपंच यांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही अशी कार्यवाही सात दिवसाच्या आत करावी अन्यथा न्याय मिळेपर्यंत आपण आमरण उपोषण करू असे निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे.

नेमणुका चालु आहेत संपर्क करा

कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज” साठी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात आणि तालुक्यात प्रतिनिधी, पत्रकार ,जाहिरात प्रतिनिधी, फोटोग्राफर तसेच

कार्यकारी संपादक,उपसंपादक, सह संपादक,वृत्त संपादक,विभागीय संपादक,व्यवस्थापकीय संपादक इत्यादी जागा भरणे चालू आहे तरी पत्रकारिता क्षेत्रात स्वतःचे करिअर करू इच्छिणाऱ्या  इच्छित तरुण- तरुणींनी / पुरुष, महिला यांनी तात्काळ संपर्क करावा .

संपर्क :

* भारत पवार ( मुख्य संपादक) – 9158417131

* अनिता पवार ,( व्यवस्थापीका)- 7875163431

* रवींद्र बागुल ,( विभागीय व्यवस्थापक) – 8308996933

* प्रमोद पवार – ( विभागीय ब्युरो चिफ)- 9075137518

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here