माहोरा : प्रतिनिधी -जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील माहाेरा गावी ग्रामपंचायतीत माझ कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमे विषयी बेईठक संपन्न झाली
यावेळी सर्वच ग्रामस्थ जबाबदारीने उपस्थित होते. विशेष म्हणजे आज पर्यंत ह्या गावी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने गावात समाधानाचे वातावरण असून मंठा पंचायत समिती आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तर ग्रामस्थांनी अशीच स्वतःची जबाबदारी कटाक्षाने कायम पाळावी असे आवाहन प.समिती सभापती, उपसभापती ,गटविकास अधिकारी यांनी केली आहे. घरा-घरातील प्रत्येक नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्याचे सरपंच सुभाष चव्हाण यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आज ही माहोरा गाव करोना मुक्त आहे आणि कायम राहील अशी ग्वाही उपसरपंच प्रल्हाद बिडवे यांनी सांगितले.
सर्व्हे माहोरा गावातील आशा सेविका कविता सुनील मोरे व जि.प.शाळेचे महात्मे सर करत आहेत.या वेळी गावचे माजी उपसरपंच ईश्वर मोरे,सदस्य सुभाष मोरे, इसाक पठाण ,कृष्णा राठोड, ग्रामसेवक,युवा समाज सेवक आशिष मोरे ,किरण मोरे ,संदेश मोरे ,शुभम मोरे, रवि मोरे व गावकरी उपस्थीत होते.
.बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतीनीधी :आशिष मोरे (मंठा जालना)