मुंबई :- भारत पवार – महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.दादा भुसे यांची अनेक वर्षांपासूनची असलेली तळमळ अखेर सत्कारणी लागली असून नासिक जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंद पसरला आहे, तर अनेक वर्षांपासूनची आपली हि ईच्छा पूर्ण होत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना योग्य करिअर ची संधी यामुळे प्राप्त होणार असून याचे आपणास समाधान असल्याची प्रतिक्रिया कृषी मंत्री ना.दादा भुसे यांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलतांना व्यक्त केली. नासिक जिल्ह्यातील शेतकरी व विद्यार्थी हिता करीता मालेगाव येथे भव्य संकुल उभारणी साठी भुसे सातत्याने प्रयत्नशील होते त्यांचे प्रयत्न अखेर सत्कारणी लागले असून कृषी विज्ञान संकुल मालेगावी स्थापन करण्या साठी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील म.फुले कृषी विद्यापीठास महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची शेतजमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आल्याची माहिती ना.भुसे यांनी दिली.