*दहिवडच्या जिजामाता विद्यालयाचा “शिक्षक आपल्या दारी” आदर्श उपक्रम*
वासोळ वार्ताहर ता.२९
सध्या कोरोना च्या पार्श्वभूमी राज्यभर शाळा बंद आहेत मात्र ‘शाळा बंद शिक्षण चालू ‘ याअंतर्गत विविध शाळेतील कर्मचारी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. याचप्रकारे दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकांनी”शिक्षक आपल्या दारी “हा उपक्रम राबविला आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दहिवड ता.देवळा येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी चे दहावीचे वर्ग असून तीनशेच्या आसपास शाळेचा पट आहे. विद्यालयात आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्याही बऱ्याच प्रमाणात आहे.
शाळा उघडून तीन महिने होत आले परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू होणे अवघडच आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे उपक्रमशील मुख्याध्यापक सुनिल शिंदे सर यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात टिकवून ठेवले आहे. उपक्रमांतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा इयत्तानिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत. यावर शिक्षकांनी आपल्या विषयांचे व्हिडिओ पाठवणे, नंतर स्वतः विषय शिक्षकांनी व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना पाठविणे तसेच या गोष्टींचा विद्यार्थी कितपत लाभ घेत आहेत हे शोधण्यासाठी आम्ही ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ ही अभिनव संकल्पना सर्वप्रथम जिल्ह्यात राबविली. त्याचे पालकांनी विद्यालयातील शिक्षकांचे कौतुक केले. या भेटीमध्ये शिक्षकांना अनेक उणिवा जाणवल्या. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, एकाच कुटुंबातील भाऊ-बहीण वेगळ्या वर्गात असणे. मोबाईल दिल्यावरही मुले मोबाईलमधील गेम खेळतात. या सर्व गोष्टींचा विचार करून झूम मिटींगचे नियोजन केले. त्याचे इयत्ता व विषयनिहाय वेळापत्रक तयार करून झूम मिटिंग चालू केली. त्याचे विद्यार्थ्यांना नवल वाटले, कारण त्यांना आपले विषय शिक्षक आपल्या वर्गातील मुले दिसायची; हे करीत असतानाच त्यांनी गुगल फॉर्म तयार करून चाचणी परीक्षा घेतल्या. या सर्व उपक्रमांना पालक व विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली.
ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षक शाळेत उपलब्ध असतात. या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेविषयी अभ्यासाविषयी गोडी टिकवून ठेवण्यात मोठाच हातभार लागला. कारण ग्रामीण भागातील मुले मुख्यतः शेतीसारखे अनेक कामांना आपल्या पालकांना हातभार लावतात. त्यात शिक्षकांनी तारेवरची कसरत करून विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात टिकून ठेवले, हे महत्त्वाचे काम शाळेने केले. या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे दहिवड व परिसरात जिजामाता माध्यमिक विद्यालय चर्चेचा विषय आहे.
याकामी उपशिक्षक विवेक सागर, सुरेश आहेर, मुरलीधर भामरे, किशोर आहेर,भरत निकम,समाधान निकम,विनोद शिंदे व भाग्यश्री पाटील या शिलेदारांची मुख्याध्यापक श्री. सुनिल शिंदे यांना अनमोल साथ लाभली. कारण एखादा उपक्रम यशस्वी व्हायचा असेल तर त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची साथ हवी असते. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक केदा आहेर तसेच संस्थेच्या अध्यक्षा धनश्री आहेर यांनी कौतुक केले.