भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक.
आपल्या परिसरातील बातम्या , इतर घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क : 9158417131
ओझर टाउनशिप : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : एच ए एल (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ) ओझर , नाशिक विभागच्या कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीची ३१ जागांसाठीची निवडणूक मोठ्या आरोप प्रत्यारोपाने पार पडली. यात श्री आपला जागृती पॅनल व श्री श्रमशक्ती पॅनल अशी दुरंगी लढत अटीतटीच्या मीटिंग घेत शांतेत पार पडली. श्री श्रमशक्तीचे नेतृत्व एच ए एल कामगारांनी साफ नाकारून त्यांना धोबी पछाड करून श्री श्रम शक्तीचे सुफड च साफ केले.मात्र त्यांना केवळ तीन जागा घेऊन नाईलाजास्तव समाधान मानावे लागले.हे पण खरे.
गेल्या तीन वर्षांपासून संजय कुटे यांच्या नेतृत्वावर कामगारांनी विश्वास टाकला असून याही वर्षी कुटे यांच्या नेतृत्वावर श्री आपला जागृती पॅनल तयार करून कुटे आणि त्यांचे शिलेदार निवडणुकीस सामोरे गेले.३१ जागा साठी झालेल्या निवडणुकीत कुटे यांच्या श्री आपला जागृती पॅनलला कामगारांनी भरभरून दाद देऊन पुन्हा कुटे यांच्यावर विश्वास टाकून २८ उमेदवार निवडून आल्याने कुटे यांच्या पॅनलने निर्विवाद बहुमत प्राप्त केले.
यावेळी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना कुटे यांनी सांगितले की , कामगारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि माझ्या कोणत्याही कामगारांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही.आणि अन्याय सहन केला जाणार नाही. कामगारांनी गत तीन वर्षांपासून माझ्या नेतृतवर विश्वास टाकून माझे नेतृत्व स्वीकारले आहे त्यामुळे मी त्यांचा विषेडाचा बांधील असून त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचे मी सोनेच करणार. आणि खरा संजय कुटे म्हणून खरी ओळख निर्माण करणार.मी कुणाची मुलहिजा न करता कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार .असेही कुटे यांनी यावेळी सांगितले.
कामगारांचे पे रिव्हिजन बाबतीत विचारले असता कामगारांना भरभरून मनासारखे पे रिव्हिजन मिळून देणारच त्याबाबतीत अन्याय सहन केला जाणार नाही .जो आजपर्यंत अन्याय केला गेला आणि केला जात आहे त्याची योग्य भरपाई केल्या शिवाय राहणार नाही असे ही नवनियुक्त जनरल सेक्रेटरी संजय कुटे यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.
काल रविवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सर्व जागांचे निकाल घोषित होताच श्री आपला जागृती पॅनल कडून मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येने डिजेच्या तालावर जल्लोषात ताल धरत विजयी उमेदवारांनी व समर्थकांनी ठेका धरला होता.
यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी विजयी उमेदवारांना स्वतः येऊन भेट देत त्यांचे अभिनंदन करत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
” श्री आपला पॅनलचे ” निवडून आलेले उमेदवार – अध्यक्ष – अनिल मंडलिक , जनरल सेक्रेटरी – संजय कुटे, उपाध्यक्ष -( ४ जागा ) – राकेश गर्जे , प्रवीण गाढे , आनंद गांगुर्डे , सहसेक्रेटरी – (४ जागा ) – प्रतीक गोळेसर , रोशन कदम , जगन्नाथ खोले , योगेश अहिरे , खजिनदार _ प्रशांत आहेर , कार्यकारणी सदस्य – रवी गरुड , अशपाक बागवान , आशिष भागवत , नरेंद्र खैरनार, प्रभाकर ढाकणे , त्र्यंबक बहिरम , खुशाल जाधव , हेमंत ठाकूर , मुकुंद क्षीरसागर , उमेश जाधव , सचिन वारुळे , लिना सोनार ,कमलाकर बनकर , सोमनाथ जाधव , हितेश गंगापूरकर , परिमल जोशी , प्रकाश पतके , विकास जाधव , श्रीकांत घुले. ” श्री श्रम शक्तीचे विजयी झालेले ” -( उपाध्यक्ष) – गणेश गवारे, ( सह सेक्रेटरी ) – योगेश अहिरे, (कार्यकारणी सदस्य) – नवनाथ मुसळे .ह्या तिघा उमेदवारांनी आपले खाते उघडून कामगारांसाठी चांगली शक्ती लाऊन ” श्रम ” करण्याची धुरा हाती दिली.


