भारतराज पवार , राज्य मुख्य संपादक. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहचण्यासाठी आपल्या परिसरातील बातम्या व अन्य घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क : ९१५८४१७१३१. देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल आणि न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यातील खर्डे गावी गो शाळेचे उद्घाटन आज सकाळी नुकतेच संपन्न झाले.
देवळा तालुक्यातील खर्डे गावातील र्वै. वामनानंद महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या गो शाळेचे उद्घाटन चांदवड – देवळा तालुक्याचे लाडके नेतृत्व असलेले आ.राहुलदादा आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गटाचे ) प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.प्रशांत धर्माधिकारी , सहा.आयुक्त डॉ.सुनील धांडे, देवळा येथील पशू विकास अधिकारी डॉ.पूजा घाडगे , किर्तन केसरी हभप संजयनाना धोंडगे , महंत गणेशनाथजी महाराज , महंत गणेशनाथजी गुरुजी , हभप पुंडलिक महाराज देवरे , खर्डा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण देवरे , उपाध्यक्ष अंकुश सोनवणे , संस्थेचे पदाधिकारी उमेश आहेर यांचेसह सर्व संचालक गावातील मान्यवर , कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

