

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक देवळा / माळवाडी : कटा महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : माळवाडी गाव देवळा तालुक्यात नंबर वन आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा संकल्प ग्रामसेवक संभाजी देवरे यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना व्यक्त केला.
संभाजी रामभाऊ देवरे यांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा निवड समितीमार्फत दिला जाणारा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र न्यूज चॅनलचे राज्य मुख्य संपादक भारतराज पवार यांनी त्याची दखल घेऊन दूरध्वनी द्वारे संपर्क साधून देवरे यांची मुलाखत घेतली त्यासंदर्भात देवरे बोलत होते. आपणास जिल्हा निवड समितीमार्फत पुरस्कार दिला गेला यावरच न थांबता भविष्यात माळवाडी गावासाठी आपण काय करणार आहात ? याबाबत बोलतांना संभाजी देवरे यांनी सांगितले की , माझ्या कारकीर्द पर्यंत मी माळवाडी गावासाठी आणि गावातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे. गावाचा विकास करून गावाचा कायापालट करणार आणि नक्कीच देवळा तालुक्यात विकासाच्या बाबतीत माळवाडी गाव नंबर वन अर्थात एक नंबर आणणार याकरिता माझा प्रयत्न राहणार आहे. असा संकल्प संभाजी देवरे यांनी बोलून दाखविला.
आजचा गुढी पाडवा आणि मराठी नववर्ष महाराष्ट्र भर मोठ्या उत्साहात साजरे होत असते या नववर्षाच्या निमित्ताने अनेक जण आपला संकल्प जाहीर करतात. या पाडव्याच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढी पाडवा म्हणून साजरा करत असतो. त्या निमित्ताने ग्रामसेवक देवरे यांनी आपला संकल्प महाराष्ट्र न्यूज शी बोलताना व्यक्त केला. शासनाच्या अनेक विध योजना असतात त्या राबवत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. बऱ्याच वेळा विरोधाचा सामना करावा लागत असतो म्हणून पळून जावे लागत नाही.आपण समाजाचे काही देणे लागतो आणि शासकीय नोकरी करत असताना शासनाचे व जनतेचे संबंधाचे हित लक्षात घेऊन आणि स्वतःचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन कामे करावी लागतात .आणि तेच मी करत असतो.परंतु यासाठी गावातील तरुणांनी , ज्येष्ठ नागरिकांनी जनहित लक्षात घेऊन सहकार्य केले पाहिजे. व गावातील शासकीय विविध विकासकामांना खीळ न घालता त्या राबविण्यात आपला हातखंडा दाखविला तर माळवाडी गावाचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी माझा उत्साह अजून वाढणार यात शंका नाही. कारण
नाशिक जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.आशीमा मित्तल मॅडम , उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.वर्षा बेडसे मॅडम , देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.राजेश कदम साहेब , सहाय्यक गट विकास अधिकारी मा.भरत वेंदे साहेब आदी कर्तव्य दक्ष , सक्षम अधिकारी जिल्ह्याला आणि तालुक्याला लाभल्या मुळे विविध योजना राबविण्यास त्यांचे सहकार्य केव्हाही मिळत असते.त्यामुळे आपल्या कामास काही अडथळा येण्याची शक्यताच नाही .असेही देवरे यांनी सांगितले. शासनाच्या जिल्हा निवड समितीमार्फत आदर्श ग्रामपंचायत अधिकारी हा मला मिळालेला पुरस्कार फक्त माझा नसून समस्त माळवाडी गावातील रहिवाश्यांचा , तरुणांचा आहे.हाच माझा स्वाभिमान आहे . याचे कारण ? विचारले असता , गेल्या वर्षी गावात विकास कामे करत असताना गावातील रहिवाश्यांनी मोलाचे सहकार्य केले होते. याही वर्षी आपला संकल्प असून भरभरून गावातील सर्वच ग्रामस्थ आणि तरुण मला सहकार्य करणारच यात शंका नाही . त्यामुळे ” माळवाडी गाव नंबर वन ” आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असेही संभाजी देवरे यांनी सांगितले. तर मला मिळालेल्या पुरस्कारासाठी गटविकास अधिकारी कदम , सहाय्यक गट विकास अधिकारी वेंदे आदींचे मार्गदर्शन लाभले असल्याचे ग्रामसेवक संभाजी देवरे यांनी शेवटी सांगितले. शब्दांकन / लेखन : भारतराज पवार . ९१५८४१७१३१
