भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक आपल्या परिसरातील घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क : ९१५८४१७१३१ मुंबई / मालेगाव : कटा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : गेल्या ८२ दिवसांपासून राजीनामा साठी मागणी होऊनही त्यावर सारवासारव केली जात होती.अखेर धनंजय मुंडेना राजीनामा द्या असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा लागला. त्याप्रमाणे धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री यांचेकडे इच्छा नसतानाही द्यावा लागला आणि मंत्रीपदास अखेर रामराम ठोकावा लागला. राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.
तर मालेगावचे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार )चे डॉ.संदीप पाटील यांनी धनंजय मुंडे यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे या कामी कचुराई करता कामा नये अशी मागणी केली आहे.
आवादा कंपनी कडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण पणे खून करण्यात असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले. धनंजय मुंडे यांचा उजवा हात (राईट हॅन्ड ) अशी ओळख असलेला वाल्मीक कराड हा या खून (हत्या ) प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे १५०० पानाचे दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे. धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ख्याती असलेला वाल्मीक याने हे कृत्य केल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संपूर्ण राज्यातून जोर धरत होती.मात्र ह्या मागणी कडे सारवासारवच केली जात होती.देशमुख यांचे फोटो काल सोशल मीडियावर व्हायलर होताच राज्य भरात जनतेत संतापाची भावना उमटत होत्या.अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत धनंजय मुंढे यांनी राजीनामा द्यावा असा आदेश दिल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आपल्या सहाय्यकांमार्फत आपला मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला.फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारून पुढील कार्यवाही साठी राज्यपाल यांचे कडे पाठविला.त्यामुळे धनंजय मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी तर झालीच परंतु इच्छा नसतानाही मुंडे यांना मंत्री पदाचे गाजर सोडावे लागले.
प्रतिक्रिया : पंकजा मुंडे: मी त्यांची लहान बहीण आहे .धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला मी स्वागत करते.हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता.उशीर झाला.
तर संतोष देशमुख यांची झालेली हत्या मानवी स्वभावाला काळीमा फासणारी आहे.धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्यावर न थांबता मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या पारड्यात राहून आणि घटनेचे गांभीर्य ओळखून मुंडे यांचा आमदारकीचा राजीनामा घेऊन त्यांना कलम ३०२ मध्ये सहआरोपी करून असे धाडस करणाऱ्यांना कायमचा चाप लावावा अशी मागणी प्यारोमेडिकल राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)चे डॉकटर सेलचे नाशिक , धुळे, नंदुरबार विभाग प्रमुख डॉ.संदीप पाटील यांनी मालेगावहून केली आहे.

