भयानक : रेल्वे दुर्घटना , जीव वाचवायला गेले , पण बंगळूर एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडले

0
29
Oplus_131072

भारतराज पवार : मुख्य संपादक , आपले गाव  आपली बातमी ” महाराष्ट्र न्यूज ” वरती … आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क: 9158417131                                              जळगाव : कटा. महारष्ट्र न्यूज : नेटवर्क : जळगाव जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी भयानक घटना घडल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून ह्या घटनेने महाराष्ट्रातील जनतेच्या अंगावर शहारे आले आहेत तर जनतेत हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याची अफवा पसरली त्या अफवेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट उडाली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी  मारल्या उड्या; परंतु ….. जळगावात 11 जणांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू…
जळगावहून मुंबईकडे येत असलेल्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी गाडीमधून उड्या मारल्या. मात्र, दुर्दैवाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडलं.

थोडक्यात घटनेचा आढावा :

▪️ मृत्यू : आतापर्यंत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू
▪️ गंभीर जखमी : 4 जण गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल
▪️ किरकोळ जखमी : 7 जण किरकोळ जखमी

घटनेचा तपशील  : ही घटना गैरसमजामुळे घडली आहे. आग लागल्याची अफवा ऐकून प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने त्यांना चिरडलं.

मदतकार्य –  घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना पाचोऱ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रशासनाची प्रतिक्रिया : जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारला लवकरात लवकर मदत पुरविण्याची विनंती केली आहे.   मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून घटनास्थळी शोध आणि मदतकार्य जोरात सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here