भारत पवार : मुख्य संपादक. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क – मो. ९१५८४१७१३१
मुंबई : कटा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : राज्यात पुन्हा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.
१-थंडी -फिंजल चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी घालवल्यानंतर, पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी (झंजावात)प्रकोप व समुद्र सपाटी पासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्चं तपाम्बरातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांचे झोता (जेट स्ट्रीम) मुळे
आजपासून खान्देश, नाशिक पासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि. १८ डिसेंबर (संकष्टी चतुर्थी) पर्यन्त थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार दि. १० डिसेंबर नंतर जाणवेल असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे .
२-पाऊस– विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता जाणवत नाही. विदर्भातही आज व उद्याच तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परवा, मंगळवार दि. १० डिसेंबरनंतर तेथेही वातावरण निवळेल.
३- ह्या १० दिवसातील तापमाने – ह्या दहा दिवसातील पहाटे ५ चे किमान व दुपारी ३ चे कमाल अशी दोन्हीही तापमाने घसरून, सरासरी इतकी म्हणजे, भागपरत्वे किमान १० ते १२ तर कमाल २८ ते ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता जाणवते.
४–शेतपिकांची काळजी व उर्वरित डिसेंबरातील थंडी – -थंडीसाठी, सध्याचे १० दिवस सुरक्षित जाणवतात. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन ह्यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा व ह्या १० दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा, असे वाटते. कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजनुसार, शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्हीही तापमाने, सरासरीपेक्षा अधिक राहून, थंडी सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे. शिवाय पूर्व प्रशांत महासागरात ‘ ला-निना अजूनही अवतरलेला नाही. त्यामुळे थंडीच्या लाटांचाही प्रभाव कमी राहील,असे वाटते.