भारत पवार : राज्यमुख्य संपादक. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. मो. 9158417131
देवळा : कटा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघाचे नवनियुक्त आ.नरहरी झिरवाळ , मालेगाव बाह्यचे आ.दादा भुसे ,चांदवड देवळा विधानसभेचे आ.डॉ.राहुल आहेर तर येवला मधून निवडून आलेले आ. छगन जी भुजबळ यांची महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आर.पी.आय.(आ.) गटाचे नाशिक जिल्हा संघटक शांताराम पवार , जिल्हा नेते सुभाष अहिरे आणि पत्रकार भारतराज पवार यांनी संयुक्त पने मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे केली आहे.
५ डिसेंबर रोजी देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी महा सोहळा अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला.यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा आणि १९ राज्यांचे मुख्यमंत्री यांचे सह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत त मुंबईत आझाद मैदानावर 16 पार पडला.मंत्री मंडळाचा विस्तार ११ ते १२ तारखेच्या दरम्यान पार पडणार असून जनतेच्या हृदयात ठाण मांडून बसलेले मालेगाव बाह्यचे आ.दादाजी भुसे , विकास पुरुष आ.नरहरी झिरवाळ , संयमी व विकास कामाचे जनक आ.डॉ. राहुल आहेर , छगनजी भुजबळ यांची महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती करण्यात यावी.अशी मागणी जोर धरू लागली असून महाराष्ट्र न्यूज ह्या ऑनलाईन वेब चॅनल द्वारे मागणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे केली आहे.
आ.नरहरी झिरवाळ , आ.दादा भुसे आ. छगन भुजबळ आणि आ.डॉ.राहुल आहेर यांना मंत्री पद मिळाल्यास महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या आणि जनहिताची कामे तत्पर मार्गे लागतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण जनतेस यांच्या विकास कामांविषयी गेल्या १० ते १५ वर्षांपासून चा अनुभव आहे. असेही पत्रकार भारतराज पवार , सुभाष अहिरे, शांताराम पवार यांनी म्हटले आहे.
आ.नरहरी झिरवाळ , आ.दादाजी भुसे , आ. छगनजी भुजबळ , आ.डॉ राहुल आहेर यांनी यंदाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारत विरोधकांना जोरदार झटका देत चौघा आमदारांनी आपल्या विजयाची हॅट्रिक साधली हे त्यांनी आपापल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळेच. अशा विकास पुरुष आमदारांना जर मंत्रीपद दिल्यास त्या त्या मतदार संघात विकास कामांची सोनेरी झालर तर चढणारच परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या विकास कामांना निशित्तच सोनेरी झालर चढणार यात शंकाच नाही. आ.भुसे , आ. झिरवाळ , आ.डॉ.आहेर व आ.भुजबळ यांनी आपल्या विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या हृदयात स्थान मिळवले आहेच.त्यामुळेच लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या चौघा आमदारांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी पत्रकार भारतराज पवार , आर.पी.आय. जिल्हा नेते सुभाष अहिरे. , नाशिक जिल्हा संघटक शांताराम पवार आदींनी केली आहे.