भारतराज पवार : मुख्य संपादक. वेळ ” कमी “तरीही मतदार संघातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात अगदी काही सेकंदात पोहोचण्याची ” महाराष्ट्र न्यूज ” तर्फे “हमी”! म्हणून आजच संपर्क करा : मो. ९१५८४१७१३१
चांदवड – देवळा : कटा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे ऐन हिवाळ्यात गरम होऊ लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून अनेक ठिकाणी उमेदवारांनी बंडखोरी केल्याने काही उमेदवारांना त्यामुळे डोके दुखीला सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्या लक्ष मात्र मालेगाव बाह्य आणि चांदवड – देवळा विधानसभा मतदार संघाकडे लागले आहे.
चांदवड – देवळा मतदार संघात तर चौरंगी लढत रंगली असून ह्या लढतीकडे संपूर्ण मतदार संघातील मतदारांचे लक्ष अधिक दक्ष झाले आहे. सध्या जशी गुलाबी थंडी ह्या उत्साही वातावरणात मतदारांना आनंद देतेय तसेच मतदारांचा सुर उमेदवारप्रती उमटत आहे.असाच जनतेचा कानोसा महाराष्ट्र न्यूज ने चांदवड – देवळा मतदार संघात घेतला असता सोज्वळ , सुसंस्कृत व अंगी नम्रता असलेले भारतीय जनता पक्षाचे – शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय.(अ ) व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार डॉ.राहुल दौलतराव आहेर हेच आणतील चांदवड – देवळा मतदार संघाला विकासाची झळाळी….! असा सूर चांदवड देवळा मतदार संघातील जनतेने व्यक्त केला.
यात चांदवड देवळा मतदार संघातील अनेक मध्यम व वयस्क आणि काही तरुणांनी हा सुर व्यक्त केलाय. गेली १० वर्ष उमेदवार डॉ.राहुल आहेर यांनी आपले पाय जमिनीवर ठेऊन जनतेत राहून चांदवड देवळा मतदार संघाला विकास कामांची शिदोरी दिली तेही नम्रतेने हे विसरून चालणार नाही.असेही मतदार संघातील जनतेने यावेळी बोलतांना सांगितले. डॉ. राहुल आहेर यांना घरातूनच राजकीय वारसा लाभल्याने जनहिताची कामे , मतदार संघाचा विकास कसा घडवून आणायचा याबाबत त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. विशेष म्हणजे मतदार संघ कोणताही असो समस्या ह्या असतातच त्या सर्वच समस्या सोडविण्यासाठी कालावधी लागतोच त्यामुळे चांदवड – देवळा मतदार संघाचा पाणी प्रश्न प्रथम मार्गी लावणारच यात बदल नाही जर ह्या वेळी चांदवड – देवळा मतदार संघाचा पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशी ग्वाही उमेदवार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना दिली.त्यामुळे चांदवड – देवळा मतदार संघ आपण सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही असा मी चांदवड – देवळा मतदार संघातील जनतेस वचन देतो. गेल्या दहा वर्षांपासून जनतेने मला आमदार म्हणून निवडून देऊन मतदार संघाची तसेच जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याने चांदवड – देवळा मतदार संघात मी शासनाच्या अनेक योजना , अनेक सुविधा मी जनतेस उपलब्ध करून दिल्या. यात लेक लाडकी योजना , मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना ,पीएम किसान सन्मान निधी योजना , महिला बचत गट समृध्दी कर्ज योजना , मुख्यमंत्री आवास योजना , लाडकी बहीण योजना , माझा लाडका भाऊ योजना , महिला सशक्तिकरण योजना , सुकन्या समृद्धी योजना , मुलींसाठी मोफत शिक्षण योजना , अण्णाभाऊ साठे कर्ज योजना यांसारख्या अनेक योजना आपण चांदवड – देवळा मतदार संघातील जनतेस उपलब्ध करून दिल्या. असेही उमेदवार डॉ.राहुलआहेर यांनी यावेळी सांगितले.
ह्या वेळी जनतेने आपणास निवडून देऊन मी जनेचा सेवक म्हणून काम करणार हा माझा शब्द असून मी निवडून आल्यास गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रथम प्राधान्याने सोडविणार आणि चांदवड – देवळा मतदार संघ सुजलाम सुफलाम करणार असेही पुनश्च डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले. त्यामुळे जनतेने मला भरभरुन आशिर्वाद देऊन निवडून दिल्यास चांदवड देवळा मतदार संघाचा कायापालट केल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही अन्यथा मी राजकारणा पासून संन्यास घेणार अशी ठाम भूमिका डॉ.राहुल आहेर यांनी यावेळी व्यक्त केली.
माझे वडील स्वर्गीय दौलतराव ( बाबा) आहेर यांनी आपणास शब्द दिला होता की, जमिनीवर पाय ठेऊनच आणि जनतेत राहूनच जनविकासाची कामे केली गेली पाहिजे. गरीब , मध्यमवर्गीय, मजूर , कामगार यांच्या समस्या जवळून अनुभवत त्या सोडवाव्यात त्याप्रमाणेच मी माझे पाय जमिनीवर ठेऊन जनतेत राहून जनतेच्या समस्या जाणून घेऊन सोडवत आलो. राजकारणाचा वारसा घरातून लाभल्यामुळे शासनाकडून जनतेची विकास कामे करून घेण्याची जिद्द आणि अनुभव डॉ.राहुल आहेर यांना चांगलाच असल्या कारणाने आणि चांदवड देवळा मतदार संघास संयमी , सुसंस्कृत व नम्रतापूर्वक नेतृत्व लाभल्याने चांदवड देवळा मतदार संघात विकासाची झळाळी डॉ.राहुल आहेर हेच करू शकतील यात शंकाच नाही असेही शेवटी चांदवड – देवळा मतदार संघातीलअनेक जाणकार मतदारांनी यावेळी सूर व्यक्त केला.