लाडकी बहीण योजना बंद ? जाता जाता भरमसाठ योजना जाहीर केल्याने त्यांची अंमलबजावणी करणे म्हणजे अवघड जागेवरच दुखणे

0
33
Oplus_131072

भारतराज पवार  :  राज्य मुख्यसंपादक.                   कमी वेळात आपल्या मतदारसंघातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात अगदी काही सेकंदात पोहचण्यासाठी तात्काळ संपर्क करा.          संपर्क : महाराष्ट्र न्यूज मो. ९१५८४१७१३१                

मुंबई : कटा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क राज्यात विधानसभा निवडणुकीचे काहीसे थंडच वारे वाहू लागल्याने बऱ्याचशा उमेदवारांना थंडी वाजू लागली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांनी बंडखोरी पुकारल्याने अनेक दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू करून महिलांना आमिष दाखवल्याचे बोलले जात आहे तर त्यामुळे महागाई भरमसाठ वाढल्याने महागाई मुळे गरिबांच्या दिवाळीवरच महाराष्ट्र सरकारने पाणी फिरवल्याने लाडके पाहुणे जबरदस्त सरकारवर नाराज असल्याचे चित्र आहे.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने शेवटी शेवटी भरमसाठ योजना जाहीर केल्या परंतु त्यांची अंमलबजावणी होणे अवघड जागेवरच दुखणे आहे त्यातीलच एक योजना म्हणणे ” लाडकी बहीण ” योजना. सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडकी बहीण योजना बंद पडल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. अनेक किराणा वस्तूंचे भाव गगनाला भिडले त्यामुळे राज्यातील नागरिक हैरान झाले आहेत. भ्रष्टाचारी भाजप युती सरकार राज्यातील जनतेस नको झाले आहे त्यामुळे युती सरकारला घालवण्याचा निश्चय जनतेने केला आहे  आता भाजप युतीचे भ्रष्ट सरकार जाऊन जनतेच्या आशा –  आकांक्षा पूर्ण करणारे मविआचे सरकार येणार असेही चेन्नीथला यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here