भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक. मतदार संघ मोठा तरीही नाही होणार तोटा, म्हणून अगदी काही सेकंदात आपल्या मतदार संघातील प्रत्येक घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी आजच संपर्क करा.मो. ९१५८४१७१३१
मालेगाव : कटा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगावबाह्य मतदार संघाचा विकास करण्या साठी सगळेच वल्गना करत असतात.हा आजवरचा इतिहास आहे.पाहिले तर दोन टर्म आमदार आणि दोन टर्म मंत्री राहून सुद्धा मालेगाव बाह्य मतदार संघ विकासापासून वंचित असून जर खरोखर आपल्या मालेगाव बाह्य मतदार संघाचा विकास करायचा असेल तर विकास पुरुष बंडूकाका बच्छाव यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन निखिल पवार यांनी यावेळी केले. बंडूकाका बच्छाव उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या मतदारांच्या जाहीर सभेत पवार बोलत होते.
पुढे बोलताना पवार यांनी सांगितले की, गेली १० वर्ष आमदार पद भोगले आणि १० वर्ष मंत्री पद उपभोगले तरीही मालेगाव बाह्य मतदार संघ विकासापासून दूरच आहे.केवळ सिमेंट रस्ते केले म्हणजे विकास होत नाही तरीसुद्धा गेल्या तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या सभेत पालकमंत्री पद भोगलेल्यांच्या तोंडून दादागिरीची भाषा असणे अपेक्षित नव्हते.त्यामुळे जनता नाराज झाली असून ही दादा – गिरी संपवण्याची वेळ असून ती संपवली जावी या साठी विकास पुरुष बंडूकाका बच्छाव यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे हि पवार यांनी यावेळी सांगितले.
चांगले डांबरी रस्ते असताना ते उखडून टाकून सिमेंट रस्ते बनविणे म्हणजे विकास होत नाही.बंडूकाका बच्छाव आज पर्यंत कुठल्याही राजकीय पदावर निवडून न येता बारा बलुतेदार संघटनेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी आजवर लाखी जनतेच्या संपर्कात राहून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या सोडविल्या.अनेकांना मदतीचा हातही दिला. तर मालेगाव बह्याचा विकास करून. मतदारसंघाचा कायापालट करायचा असेल तर बंडूकाका बच्छाव हेच करणार यात शंकाच नाही हे मतदार संघातील जनता जनार्दनास चांगले माहीत आहेच.आणि याचा अनुभव मतदार संघातील जनतेसह मालेगाव तालुका आणि बाहेर गावातील जनतेस सुद्धा अनुभव असलेला आहे.बंडूकाका बच्छाव यांचे तोंडून आजवर दादागिरीची भाधा कधीही कोणी अनुभवली तर नाहीच ती भाषा केवळ मंत्री महोदय यांच्या तोंडून ऐकण्यास मिळणे ह्या दादा – गिरीत पुन्हा वाढ होऊ द्यायची नसेल आणि शिवतीर्थ मनाप्रमाणे पाहिजे असेल तर बंडूकाका बच्छाव यांना प्रचंड मतांनी विजयी करा असेही पुनश्च निखिल पवार यांनी सांगितले.
यावेळी हजारोंच्या संख्येने मतदार उपस्थित होते. सर्वसामान्यांचा विकास , गरीबांचा खरा विकास करणारे रत्न म्हणजे बंडूकाका च असल्याचे यावेळी अनेकांच्या तोंडून हेच शब्द निघत होते.