कुर्ल्यात वातावरण तणावपूर्ण , मोरजकरांना उमेदवारी दिली तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल

0
21
Oplus_0

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक.                     आपला मतदार संघ, आपला उमेदवार म्हणून ” महाराष्ट्र न्यूज ” ह्या वेब चॅनल साठी सणसणीत मुलाखत देऊन काही सेकंदात आपल्या मतदार संघातील प्रत्येक घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात अगदी सहजच पोहचण्यासाठी संपर्क करा.संपर्क : मो. ९१५८४१७१३१                               मुंबई : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क कुर्ल्यातील माजी नगरसेविका प्रविना मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ पेक्षा अधिक व्यक्तींवर खोटे ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल केला चा आरोप संभाजी ब्रिगेड संघटनेने केला. संघटनेने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे प्रकरण उघडकीस आणले.  मोरज करांनी दाखल केलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचे पुरावे ही समोर आले. कुर्ल्यातील नेहरूनगर पोलीस ठाण्यात दोन मराठा समाजातील व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या एफ आय आर या प्रकरणास अधिकच गती मिळाली.

या घटनेनंतर स्थानिक मराठा समाजासह अनेक मराठा संघटनांनी एकत्र येत मोरज करांना मराठा विरोधी  घोषित केले. मोरजकरांच्या उमेदवारीमुळे मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला असून संभाजी ब्रिगेड हि संघटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युतीत असल्याने जर मोरजकरांना उमेदवारी दिली तर मराठा समाज त्याविरुद्ध रस्त्यावर उतरेल असा सणसणीत इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे. स्थानिक मराठा समाज व अन्य मराठा संघटनांनी या पूर्वीच बॅनर बाजी लावत आपला विरोध दर्शवला आहे. सध्या कुर्ल्यातील वातावरण तणावपूर्ण शांततेत असून ठाकरेंच्या शिवसेनेला या स्थितीत बॅकफूटवर जावे लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here