महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा घोळ अखेर मिटला पण….

0
225
Oplus_0

भारतराज पवार : मुख्य संपादक.                             आमचा मतदार संघ आमचा उमेदवार साठी धडक बेधडक मुलाखती साठी अवश्य संपर्क करून काही सेकंदात आपल्या मतदार संघातील प्रत्येक घरात घरातील प्रत्येक मतदाराच्या मनामनात पोहचा … संपर्क मो.९१५८४१७१३१

मुंबई : क टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क आचार संहिता लागताच सर्वच मोठ्या  पक्षांसह लहान सहान  पक्ष उमेदवार उभा करण्यासाठी हककाच्या मतदारसंघावर दावा करत आहेत.त्यामुळे बैठका घेऊन घेऊन नेत्यांची दमछाक होत असल्याचे समजते.असे असले तरी हाती लागलेल्या वृत्तानुसार महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा घोळ अखेर मिटला पण…..

विधानसभेच्या २८८ जागांपैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले असले तरी उर्वरित २८ जागा मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय झाला पण २८ जागांचा पेच कायम आहे.

मविआच्या नेत्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत २६० जागांचे वाटप सर्वानुमते पूर्ण झाले.यात काँग्रेस पक्षाने आघाडी घेत १०० जागा , शरद पवार गटाला ८० जागा तर उद्धव ठाकरे गटाला ८० जागा देण्याचे आघाडीतील नेत्यांनी मान्य केले आहे.

उर्वरित २८ जागा मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.ह्या २८ जागांवर दोन पक्षांनी दावा केला आहे.पण २८ जागांचा पेच कायम असून हा घोळ मात्र सुटलेला नाही. ह्या जागांसाठी महविकास आघाडीत चर्चा सुरू असल्याचे समजते.त्यामुळे येत्या १/२ दिवसात जागा वाटपाचा पेच कायमचा सुटणार आणि जागा वाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले असल्याचे कळते.

रामटेक , दक्षिण नागपूरच्या जागेवरून तिढा महाविकास आघाडी मध्ये कायम असल्याचे समजते.दोन्ही काँग्रेस , उद्धव ठाकरे गट रामटेक व दक्षिण नागपूर साठी आगरी असल्याचे समजते.त्यामुळे दोन्ही जागांची तूर्त थांबवली असून येवढ्या १/२ दिवसात फायनल निर्णय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here