शासकीय जिल्हा आरोग्य खात्याची अब्रू चव्हाट्यावर ..! काळीमा लागला डॉ. चारुदत्त शिंदेंच्या कारभारावर ..!! महिलांमध्ये संताप , कर्मचाऱ्यांचा कारभार भोंगळ की ड्युटीवर आलेली मरगळ ?

0
210
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक.                    धडक बेधडक राजकीय मुलाखती साठी संपर्क करा.आपण दिलेली मुलाखत मतदारांच्या घराघरात तर त्यांच्या मनामनात अगदी काही सेकंदात सर्वदूर पोहचणार . संपर्क मो.९१५८४१७१३१ 

नाशिक : कटा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल नेटवर्क जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात धक्कादायक बाका प्रसंग घडल्याने चक्क आरोग्य खात्याची अब्रू चव्हाट्यावर आल्याने काळीमा लागला डॉ. चारुदत्त शिंदेंच्या कारभारावर..! त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची दे अब्रू झाल्याचे घडलेल्या बाका प्रकारामुळे दिसले. त्यामुळे महिला वर्गात धक्कादायक घटनेचा संताप व्यक्त केला जात असून  शासकीय  जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाचा कारभार भोंगळ की ड्युटीवर असलेल्यांची मरगळ ? नेमके काय म्हणावे हेच सर्वसामान्यांना कळेनासे झाले आहे.घडलेल्या ह्या प्रकारामुळे जिल्हा शल्य चिकित्सक ( सिव्हिल सर्जन ) डॉ चारुदत्त शिंदे यांचा कर्तव्याचा वचक कमी पडतो की काय? अशी शंका यामुळे वाटू लागल्याने महिला महिला रुग्णांबरोबरच पुरुष रुग्णांनी जिल्हा रुग्णालयातील कारभारावर विश्वास ठेवावा कसा ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होतो आहे.

ह्या घटनेमुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रा महिला व पुरुष वर्गाला संताप व चीड निर्माण करणारी अचंबित धक्कादायक व झ्टका देणारी घटना शासकीय जिल्हा रुग्णालयात घडली ती अशी की चक्क बाळाची आदला बदल झाल्याचे समोर आले आहे. पिक्चर स्टाईल सारखा प्रकार जिल्हा रुग्णालयात घडल्याने आरोग्य प्रशासनावर बाकी बाका प्रसंग ओढवला आहे .हेच खरे.

बाळाची आदला बदल झाल्याचा बाका प्रसंग समजताच प्रसूती झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनास धारेवर धरत बाळ ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.त्यामुळे आरोग्य प्रशासनाची अक्षरशा झोपच उडाली आहे.

गेल्या रविवारी ( दि.१३/ १०/०२४) डिलेवरी साठी एक महिला नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केली होती.महिलेने बाळाला जन्म दिल्या नंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मुलगा झाल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या रजिस्टर मध्येही मुलाच्या जन्माची नोंद केली. परंतु रुग्णालयातून मंगळवारी (दि.१५) रोजी त्या प्रसूती झालेल्या महीलेल्या डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी प्रमाणपत्र देताना मुलगी झाली म्हणून देण्यात आले आणि सुट्टी होताच महिलेच्या हाती मुलगी देण्यात आली.त्यामुळे प्रसूती झालेल्या महिलेच्या नातेवाईकांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये वाद झाले.ह्या गंभीर प्रकरणाने जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आली तर सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या कारभारास काळीमा लागल्याने आरोग्य प्रशासनाची झोप तर उडालीच परंतु जोरदार खळबळ माजली आहे.कुटुंबीयांनी बाळ ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.याबाबत प्रहार संघटनेने खंबीर भूमिका घेतली असून आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे आणि सावळ्या गोंधळामुळे आरोग्य खात्यात मोठा पेच उभा ठाकला असून याबाबत एक पथक नेमून सीसी फुटेज तपासून चौकशी करण्यात येणार असल्याचे डॉ. चारुदत्त शिंदे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here