आचारसंहिता लागू २० नोव्हें.मतदान तर २३ नोव्हें. निकाल , महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना वरचढ ठरणार की लाडके पाहुणे नाराजी ठोकणार याची उत्सुकता !

0
111
Oplus_0

भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक.                    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तसेच  राजकीय नेत्यांच्या मुलाखती    आणि             दिवाळीत आपल्या दुकानाची , व्यवसायाची , हॉस्पिटलची , संस्थेची , मित्र परिवार , नातेवाईकांसाठी शुभेच्छा  जाहिराती साठी संपर्क साधावा आपली जाहिरात महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात.आजच संपर्क करा मो. ९१५८४१७१३१     नवी दिल्ली  : क टा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुका घोषित केल्या. आणि कालपासूनच आचारसंहिता राज्यात लागू करण्यात आली. आदर्श आचार संहितेचे काटेकोर पणे पालन सर्वत्र करण्यात यावे असे आवाहनही आयोगाने यावेळी केले.महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे.मतदान २० नोव्हेंबर ०२४ रोजी तर निकाल २३ नोव्हेंबर ०२४ रोजी जाहीर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हे . ०२४ रोजी संपणार असल्याने त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी साठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र असल्याने दोघा पार्टीतील बड्या नेत्यांनी तितकाच तुल्य बळ उमेदवार पारखून निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.असे असले तरी मनसे , वंचित बहुजन आघाडी , स्वराज्य पक्ष हे मात्र काही मतदार संघातील मतांची बिघाडी करून गणित बिघडवू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती मधील बड्या नेत्यांना याबाबत सावधान पोझिशन स्वीकारावी लागणार असे चित्र आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी इंडिया आघाडीला ३१ तर एनडीए ला  १७ जागा मिळाल्या त्यावेळी एनडीए ने तर छातीठोक सांगितले होते की महाराष्ट्रात आमच्याच जास्त जागा लागणार झाले वेगळेच की निमूटपणे सहन करावे लागले.यात भाजप ला ९ , शिवसेनेला ७ आणि मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ १ जागा मिळाली.

महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी घणघोर टक्कर बघायला मिळणार असल्याने लाडकी बहिण योजना वरचढ ठरणार की लाडके पाहुणे नाराजी ठोकून वरचढ ठरणार याची मात्र उत्सुकता लागून आहे. विकास कामांचा जोरदार धमाका की विरोधकांचे खडे बोल निशाणा साधणार ?  जनमत कोणाला तारणार याचा फैसला मतदार राजा करणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here