भारतराज पवार , राज्य मुख्यसंपादक. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क साधावा. मो. ९१५८४१७१३१
माळवाडी / देवळा : कटा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यातील माळवाडी येथील पवार व खरे कुटुंबीयांनी बसवलेल्या गणपती बाप्पांचे जल्लोषात विसर्जन गिरना नदी पात्रात करण्यात आले.यावेळी अनेक आप्तेष्ट , मित्र परिवार गणरायास निरोप देण्यासाठी नदी किनारी उपस्थित होते.यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
खरे आणि पवार कुटुंबीयांनी बसवलेल्या गणपती बाप्पाचे हे प्रथम वर्ष होते. पवार कुटुंबातील नातू चि. विराज भा. खरे यांच्या प्रेमाखातर व आग्रहाने पवार यांच्या राहत्या घरी गणपती बाप्पा बसविण्यात आला होता.
यावेळी अनेकांना आश्चर्य वाटले होते. तर अनेक जण हर्षोलीत झाले होते.खूपच आनंदाच्या वातावरणात बाप्पांचे रोज सकाळी, संध्याकाळी आरती अनेक लहान मोठ्या भक्तांच्या उपस्थितीत होत असे.लहान भक्त हे मात्र मोठ्यांचे आकर्षण ठरत होते. लहानाची गर्दी आणि त्यांच्यातील उल्हास हे विशेष आकर्षण होते.
शेवटच्या ११ व्या दिवशी मंगळवारी सायंकाळी गावातील सर्व भक्तांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. गावातील शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री १०.३० पर्यंत भक्त गण महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत होता. शुभ वेळ नुसार रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी माळवाडीतील पवार व खरे परिवारातील तसेच देवळा , लोहणेर गावातील लहान मोठ्या गणपती बाप्पांचे बोटी वर समूहाने गिरना नदीच्या पात्रात मध्यभगी गणपती बाप्पांचे पाण्यात विसर्जन करण्यात आले.यावेळी पवार परिवारातील अनेक सदस्य भाऊक झाले होते. तर विराज खरे यास मात्र अश्रू अनावर झाले होते.
यावेळी सुरुवाती गणपतीची आरती करून “, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.. ! अशा घोषणाही देण्यात आल्या. अनिता पवार , लताबाई पवार , सविता साबळे – पवार , ग्रिष्मा ( दादू ) पवार ,अनु पवार , सुरेखा ( निशा) पवार , कविता खरे _ पवार , शोभा जावरे , सुनीता बागुल , कु. वैदेही ( गोलू) पवार , चि. विराज खरे , चि.विशू साबळे , महेश पीकाकाजी सोनवणे ,देवळा , मनोज ( देवाभाऊ) अहिरे , मनमाड , अनिल अहिरे , मालेगाव , योगेश महाजन , प्रमोदकुमार ( आबा ) पवार , विजय पवार यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
गिरना नदी पात्रा जवळ देवळा पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.