नाशिक सा.बां.विभागात संगनमताने केला कोट्यावधींचा भ्रष्टाचार …! पटेकरांनी उपसले बेमुदत उपोषणाचे हत्यार , अधिकारी आता तारणार की” बेघर ” होणार

0
46
Oplus_0

भारतराज पवार  : राज्य मुख्य संपादक                       महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क साधावा.मो.९१५ ८४१७१३१
नाशिक :    कटा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग नाशिक येथे कार्यरत कार्यकारी अभियंता  राहुल के पाटील तसेच उपविभागीय अभियंता एस.ए पवार , यू.पी कुमावत ,व्ही.पी बाविस्कर , यु.एल देसले , एच.ए पाटील , जे.एम वाघ तसेच शाखा अभियंता ,व्ही. व्ही घुगे , डी.एस साळी ,एम एच जाधव ,आर आर सावंत व. इतर यांनी  आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कोट्यावधी रुपयाची कामे करण्यात आलेली आहे या कार्यक्रमांतर्गत रस्त्याची देखभाल दुरुस्तीची कामे शासकीय इमारतींची देखभाल दुरुस्ती,आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोच रस्ते तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक या कार्यालयाकडे प्राप्त झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक या कार्यालयाच्या अधिपत्याखाली सार्वजनिक बांधकाम (उत्तर )विभाग नाशिक कार्यरत असून या विभागीय कार्यालया अंतर्गत करण्यात कागदपत्रे पूर्ण दाखवलेल्या कामात भ्रष्टाचार झालेला आहे या विभागामार्फत केलेल्या कामात संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्वरित निलंबित करणे या मागणीसाठी दिनांक २०/०८/२०२४ पासून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात झालेली आहे या उपोषणाचे प्रमुख मार्गदर्शक अनंत पटेकर (माहिती अधिकार कार्यकर्ते) असून या उपोषणात सूर्यकांत भालेराव नाशिक,गणेश पवार राहुरी,संदीप पवार अहमदनगर, मुकेश शिरसाठ कल्याण, अभिषेक सोनवणे घाटकोपर श्रीमती लीना अहिर मुंबई सचिन जाधव,प्रमोद वाघमारे भरत जाधव रवींद्र पाटील तसेच असंख्य अन्य महिला कार्यकर्त्या इत्यादी सहभागी झालेले आहेत जोपर्यंत चौकशी होऊन भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे अनंत पटेकर यांनी सांगितले .

भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार अशी ठाम भूमिका पटेकर यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे त्यामुळे भ्रष्टाचारी अधिकारी तारणार की बेघर होणार याकडे नाशिक जिल्ह्यातील दक्ष नागरिकांचे लक्ष लागले असून शासन नेमकी काय भूमिका घेणार हे महत्वाचे असून उपोषणकर्ते पटेकर आणि त्यांचे सहकारी यांची भूमिका बदलण्यात अभियंत्यांना यश येणार की काय? याकडेही नागरिक लक्ष ठेऊन आहेत.

Oplus_131072

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here