बिबट्याच्या दहशतीने माळवाडी – फुलेमाळवाडी परिसरातील नागरिकात घबराहट ,पिंजरा लावण्याची मागणी

0
44
Oplus_131072

भारतराज पवार  : राज्य मुख्यसंपादक.                     आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो. ९१५८४१७१३१ 

देवळा / माळवाडी : कटा.महाराष्ट्र न्यूज इलेक्ट्रॉनिक वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यातील माळवाडी आणि फुले माळवाडी गावी आणि परिसरात बिबट्याच्या दहशतीने येथील शेतकऱ्यांत विशेषतः महिला वर्गात घबराहट पसरली असून ह्या परिसरात देवळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ( प्रादे ) व कर्मचाऱ्यांनी ह्या भागात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील सरपंच आणि उपसरपंचासह नागरिकांनी केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे ) देवळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी मेशी, डोंगरगाव परिसरात बिबट्याने एका महिलेच्या अंगावर हल्ला चढविल्याने महिला गंभीर जखमी होऊन गतप्राण झाली. त्यामुळे येथील परिसरातील महिला आणि शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे.त्यातच सद्या माळवाडी , फुले माळवाडी परिसरात कांध्यांची लागवड सुरू असल्याने ह्या परिसरात बिबट्याचे वास्तव असल्याची जोरदार चर्चा आहे . शेतकरी रात्री अपरात्री मळ्यात व घरी ये जा करतात त्यामुळे आपण ह्या दोन्ही गावांचे योग्य ते सर्वेक्षण परीक्षण करून योग्य ठिकाणी पिंजरा लाऊन सदर बिबट्यास जेरबंद करून पुढील अनुचित प्रसंग टाळावा अशी मागणी माळवाडी गावातील उपसरपंच मयूर सुरेश बागुल , अविनाश रमेश बागुल , प्रशांत नामदेव बच्छाव , रमेश तुकाराम बागुल , हेमंत वामन शेवाळे , महेंद्र छगन बच्छाव , देवमन दादाजी बागुल , आदींनी वनपरिक्षेत्र अधिकारी, देवळा यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here