ग्रामसेवक संभाजी देवरे यांच्या प्रयत्नाने ग्रामस्वच्छता अभियानात माळवाडी ग्रामपंचायतीने पटकावला तिसरा क्रमांक : सीईओ आशिमा मित्तल , फडोळ , वेंदे यांनी केले अभिनंदन

0
45

भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक                        आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क, मो.९१५८४१७१३१

देवळा / नाशिक  : कटा.महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सन २०२२ _ २०२३ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.त्यात देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संभाजी देवरे यांच्या नेतृत्वात माळवाडी ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता.

ग्रामसेवक संभाजी देवरे माळवाडी गावी आल्यापासून त्यांनी गावात अनेक विकास कामांवर भर देत गावात अनेक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असतात.त्यांच्याच प्रयत्नाने गावातील साफसफाई कायम ठेवण्यासाठी गावातील घान कचरा नियमित उचलण्यासाठी त्यांनी नवीनच ट्रॅक्टर ट्रॉली सह विकत घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून गावातील घान कचरा नियमित उचलला जाऊ लागला.त्यामुळे गावात स्वच्छता तर राहू लागली त्याच बरोबर साथीच्या रोगांपासून सुद्धा गाव दूर राहू लागले.यांचे श्रेय ग्रामसेवक संभाजी देवरे यांनाच जाते.त्यांच्याच मार्गदर्शनाने ग्राम पंचायतीचे आजी माजी सरपंच , सर्व सदस्य , गावातील नागरिकांनी स्वच्छतेसाठी मोठा हातभार लावला.विशेषतः गावातील तरुणांनी जास्त सहभाग घेतला आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन २०२२- २०२३ मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावल्याने ग्रामसेवक संभाजी देवरे माजी सरपंच शिवाजी वामन  बागुल यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.तर विद्यमान सरपंच अल्काबाई पवार , उपसरपंच मयुर सुरेश बागुल व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी माळवाडी गावाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करून गाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात तिसरा क्रमांक घेतल्याने माळवाडी गावातील ग्रामस्थांचे , महिलांचे आणि ग्रामसेवक संभाजी देवरे यांचे जिल्हा परिषद नाशिक सी. ई. ओ.आशीमा मित्तल , डी.सी. ई.ओ.( ग्राम पंचायत वि.) वर्षा फडोळ – बेडसे , देवळा पं.स.चे गट विकास अधिकारी भरत वेंदे , विस्तार अधिकारी देवीप्रसाद मांडवडे , सूर्यवंशी नाना , पवार आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here