भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक पत्रकार नियुक्ती साठी , जाहिरात आणि बातम्यांसाठी संपर्क : ९१५८४१७१३१
मुंबई / नाशिक : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : हे वृत्त संकलित करत असे पर्यंत काल रात्री उशिरा पर्यंत मतमोजणी सुरू होती.मात्र नाशिक शिक्षक मतदार संघात काटे की टक्कर पहावयास मिळते हे नक्की.
विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर , मुंबई व नाशिक शिक्षक मतदार संघासाठी काल सकाळी आठ वाजल्यापासून विविध मतदार केंद्रावर मतमोजणी सुरू आहे.यात मुंबई पदवीधर मधून ठाकरेंच्या शिवसेनेने डंका वाजवला असून ठाकरे सेनेचे अनिल परब यांनी विजय मिळवून बाजी मारली.तर मुंबई शिक्षक मतदार संघात ठाकरेंच्याच शिवसेनेचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी आघाडी घेतली आहे.तर कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे निरंजन डावखरे आघाडीवर होते.
नाशिक शिक्षक मतदार संघातून पहिल्या फेरीत महायुती मधील मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे आघाडीवर होते.तर महविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे दराडे यांच्या पेक्षा थोड्या फार मतांनी पिछाडीवर आहेत त्यामुळे मतमोजणीच्या वेळी सातत्याने आकडेवारी जाणार असल्याची चिन्हे आहेत.मात्र नाशिक शिक्षक मतदार संघात ” काटे की टक्कर ” असा सामना पहावयास मिळणार हे निश्चित.त्यामुळे कोणता उमेदवार ” गुलालाचा ” चाहता होणार हे सांगणे कठीण असल्यामुळे सगळ्यांचेच लक्ष ह्या लढतीकडे लागले आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघात पहिल्या फेरीत ३० हजार मतपत्रिकेची मोजणी केली जाणार.तर दुसऱ्या फेरीत ३४ ह.८५३ मत पत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. यानंतर अवैध मतांचे मोजणी करून कोटा ठरवला जाणार.मग खऱ्या अर्थाने उमेदवारांची मतांची मोजणी केली जाणार त्यामुळे नाशिक शिक्षक मतदार संघाचा निकाल रात्री उशिरा पर्यंत लागण्याची शक्यता आहे.