एक अनावृत्त पत्र : भारती ताई ,……

0
62
Oplus_131072

भारत पवार : राज्य मुख्य संपादक.                          कणखर , निर्भिड बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क..मो.९१५८४१७१३१

देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज : ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :
ताई, जनतेने निवडणूक
हातात घेतली आहे.
ताई, आपण दिंडोरी लोकसभा मतदार संघ भाजपच्या दुसऱ्यांदा उमेदवारी करत आहात.
ताई आपण केंद्रात मंत्री होता, तुम्ही म्हणालात
मी मतदार संघात म्हणे ३ हजार कोटिची कामे आणली आहेत हे एकुण आश्चर्याचा धक्का बसला, इतकं जर आपण विकासाची कामे केली आणि आपण
केंद्रीय राज्यमंत्री असून देखील आपल्याला घाम का फुटला?
मतदारसंघातील मतदार व ज्यांच्या जीवावर, ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षाला तिलांजली देऊन कमळाबाईचा हात धरला होता, या निवडणुकीत आपल्याला गावागावातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तुम्हाला प्रक्ष्नाची सरबत्ती करत हुसकावून लावले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण काय केलं? निर्याती संदर्भात उत्तप्पादक शेतकऱ्यांची प्रसार माध्यमातुन चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली, हे तर संपूर्ण महाराष्ट्रातातील जनतेला समजले, आपली जागा धोक्यात आली आहे हे समजल्यावर.
तुम्ही भुजबळाच्या बंगल्यावर जाऊन त्यांचे पाय धरावे लागले.
तुमच्या प्रचारासाठी दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे,मुख्यमंत्री शिंदे सगळ्यांना मैदानात उतरावे लागले.
तरीही दिंडोरी लोकसभेची जागा धोक्यात आहे,अंस सर्व सर्वे सांगतायत,
आहो ताई तुम्ही खरोखर काम केले असते,, मंत्री पदाचा वापर करून विकास केला असता तर स्वतःच्या मतदार संघात हमखास निवडून यायल्या पाहिजे होत्या.
स्वतः सोबत शेजारच्या मतदार संघाचीही जबाबदारी घेऊन त्याना पण निवडून आणण्यासाठी मदत केली असती, प्रचार केला असता, परंतु तसं काही झालं तरी, तुम्ही पुर्ण वेळ स्वतःच्या मतदारसंघात अडकून पडलात,
शेजारी हिना गावित, सुभाष भामरे, सुजय विखे, रक्षा खडसे होत्या. तुम्ही केंद्रीय मंत्री होता, ते ही तुमच्याच पक्षाचे उमेदवार सहकारी होते,त्यांच्या मतदार संघात जायला हवे होते.त्याना मदत करायाला हवी होती.. इथे तुमचेच वांदे झाले.
केंद्रात मंत्री असणाऱ्या व्यक्तीला स्वतः निवडून येण्याची खात्री नाहीं.
बरं ताईसाहेब समोर प्रतिस्पर्धी तऱी कोणी आहे हो, साधा शाळा मास्तर. त्याच्याकडे ना पैसा, ना माणसं, ना यंत्रणा, ना पाठीशी सरकार, ना ED CBI निवडणूक आयोग, त्याचा पक्ष फुटलेला, निशाणी नवीन, नेता वयोवृद्ध तरीही तुम्ही अटकून पडला दिंडोरीतच.
समोरच्या उमेदवारांची निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे, त्यांच्यासाठी जनताच गाड्या घोड्या, पैसा खर्च करत आहे, असं म्हणतात जेव्हा जनताच सार्वजनिक निवडणुक आपल्या हातात घेते तेव्हा निकाल कोणाच्या बाजूने कौल मिळतो ते सांगायला ज्योतिषाची गरज नसते, हे महाराष्ट्रातील जनतेने अनेक वेळा बघितले आहे,मा खा, राजु शेट्टी,आ, बच्यु कडु,आ, निलेश लंके, या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डोक्यावर घेतले व निवडुन आणलं होतं,त्याचीच पुनरावृत्ती दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाली तर आश्चर्य वाटायला नको,
शेतकऱ्यांच्या स्वप्नांची होळी झाली की ते काय जादू करतील ते बंघन बघा औचित्याचं ठरेल…
शेतकऱ्यांचा तळतळाट घेतला की घरी राहावं लागते हे निकाल लागल्यानंतर कळेलच,,, *कुबेर जाधव विठे्वाडीकर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here