भारत पवार : मुख्यसंपादक आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो. ९१५८४१७१३१ देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : कुबेर जाधव : ता.१७ : शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री करताना सतर्क राहायला हवे. ज्या मार्केटमध्ये सोयीसुविधा आणि सुरक्षितता असेन आणि चांगला भाव मिळेल अशा ठिकाणी आपल्या शेतमालाची विक्री करावी असे आवाहन कांदा व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष खंडूकाका देवरे यांनी केले. बुधवार (ता.१७) रोजी येथील सुनील आहेर खाजगी कृषी मार्केटमधील कांदा लिलाव शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, उपजिल्हाधिकारी तेजस्विनी आहेर यांच्यासह देशातील विविध राज्यातून आलेले कांदा व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी मार्केटचे संचालक सुनील आहेर यांनी केले. या मार्केटच्या शुभारंभच्या कांदा लिलावात कमाल २ हजार १२१ भाव तर सरासरी १ हजार ८५० हा भाव मिळाला. पहिल्याच दिवशी तब्बल ७५२ इतक्या वाहनांची आवक झाल्याने शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. या दरम्यान प्रसिद्ध कांदा व्यापारी संदीपकुमार ( सारंगपूर-उत्तरप्रदेश), बिट्टूदादा (बांगलादेश), मणिआण्णा (तामिळनाडू), नदीमखान (दिल्ली), रुद्रपूर राजाबाबू (उत्तरांचल), राजीव तनेजा (हरियाणा), मुन्नाभाई (कोलकाता), सुरेश चौधरी (आग्रा) यांच्या हस्ते प्रवेशद्वार, मार्केट कार्यालय, वजनकाटा, हमालनिवास, शेतकरीनिवास, बारदान सेंटर, शॉपिंग सेंटर यांची उदघाटने करण्यात आली. मार्केटचे संचालक ललित निकम व प्रफुल्ल निकम यांनी परिचय करून दिला. कांदा लिलाव शुभारंभ कार्यक्रमात देशातील अजून इतरही कांदा व्यापारी, जिल्ह्यातील कांदा व्यापारी, देवळा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी वणीचे व्यापारी मनीष बोरा, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, मालेगांवचे शरद खैरणार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नूतन आहेर यांनी मनोगते व्यक्त केली. कांदा लिलाव शुभारंभप्रसंगी सुनील आहेर, नूतन आहेर यांच्यासह शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन करून लिलावास प्रारंभ झाला. यावेळी मांगीलाल लुंकड, कांतीलाल लुंकड, हेमंत बोरसे, दादाजी ठुबे, योगेश महाजन, रमेश मेतकर, अमोल आहेर, किशोर पगार, स्वप्नील पाटील, संकेत कोतवाल, डी.के.गुंजाळ, अनिल लुंकड, भूषण संकलेचा, रमेश ठुबे, नितीन मेतकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोठाभाऊ पगार यांनी केले तर संचालक धनंजय देवरे यांनी आभार मानले. या लिलावप्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक प्रफुल्ल आहेर, ललित निकम, धनंजय देवरे, युवा कांदा व्यापारी अनिल पगार, अमोल आहेर, गोटू देवरे, सतीश कचवे, भूषण पवार आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.