भारत पवार : मुख्य संपादक पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो.९१५८४१७१३१
मुंबई : कसमादे टाइम्स( कटा.) महाराष्ट्र न्यूज :
संजय बोर्डे
१२ जानेवारी २०२४: राजमाता जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला बोरिवली पूर्व येथे अत्यंत भव्य असा राजमाता जिजाऊ चौक लोकार्पण सोहळा पार पडला आहे. खा. गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नाने निर्माण झालेल्या राजमाता जिजाऊ चौक लोकार्पण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एड.आ.आशिष शेलार उपस्थित होते. त्याच बरोबर विधानपरिषद गटनेते आ. प्रविण भाऊ दरेकर, आ.सुनील राणे, आ.मनीषा चौधरी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित अभिनेते, विचारक, समाजसेवक इत्यादी उपस्थित राहिले होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही आज पासून उद्यान सम्राट गोपाळ शेट्टी यांना प्रेरणा सम्राट सांगणार. कारण उत्तर मुंबईत खा.गोपाळ शेट्टी ने प्रेरणादायी महापुरुषांचे पुतळे निर्माण करून एक नवीन दिशा उत्तर मुंबई नागरिकांना दाखवली आहे.
यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष
एड.आ.आशीष शेलार यांनी गोपाल शेट्टी यांना
आदर्श खासदार म्हणून सांगितले. “विकसित भारत आपण आज पाहतोय. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी गुलामगिरी पुसण्याचे करत केले आहेत.
राजपथचे कर्तव्य पथ नामकरण करण्यात आले त्याच प्रमाणे खा.गोपाळ शेट्टी यांनी गुलामगिरी चे इतिहास पुसण्याचे काम करत उत्तर मुंबईत अनेक महापुरुषांचे पुतळे उभे केले आहे. आज
राजमाता जिजाऊ पुतळा त्याचे उदाहरण.
या साठी त्रिवार अभिनंदन.” असे ही मुंबई अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,
“छत्रपति शिवाजी महाराज रयते चे सन्मान, रक्षण साठी लढले, स्वतः छत्रपती व्हावे म्हणून लढा नव्हता.
तसेच देशाचे उर्जावान पंतप्रधान मोदीजीनी रामललाना भव्य मंदिरात बसविण्याचे काम केले.
लाखो कार सेवकांच्या बलिदानाने बाबरी ढांचा तुटला होता. आता भव्य राममंदिर बनल्याने
नया भारत कडे आपण चाललो आहोत.
उत्तर मुंबई त्याच प्रमाणे नव्या उत्तर मुंबई कडे वळल्या आहे. छत्रपति शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, झांसी राणी लक्ष्मीबाई आणि आज राजमाता जिजाऊ चौक चे लोकार्पण करून खा.गोपाळ शेट्टी तुम्ही उत्तर मुंबईत नवी दिशा देण्याचे काम केले आहे.”
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात आज उद्घाटन झालेल्या नवी मुंबईतील अटल सेतू विषय मांडत
“लोकांचा मनात भीती करण्याचे काम तुम्ही केले” असे सांगत उबाठाना टोमणा मारला आणि पुढे सांगितले की, “मुंबई चे परिवर्तन आम्ही करीत आहोत!”
विधान परिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर, आ.योगेश सागर, आ.सुनील राणे, आ.मनीषा ताई चौधरी यांनी आपापल्या भाषणात खा.गोपाळ शेट्टी यांचे राजमाता जिजाऊ चौक निर्माण करण्यासाठी गौरवदगार काढले.
यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित महिलांचे विशेष सत्कार करण्यात आले.
तसेच प्रसिद्ध इतिहासकार वक्ते रविराज पराडकर यांचे दृश्य श्राव्य क्लिप दाखविण्यात आले आणि प्रत्यक्ष रविराज पराडकर यांचे सत्कार करण्यात आले. संत हरीओमबाबू जी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सत्कार केले.
अभिनेते प्रदीप कबरे, श्री महेश कोठारी, सौ.उज्वला जरे, सौ.वंदना लक्ष्मण कदम, सौ.सुचिता अवस्थी महिला भाजप अध्यक्ष सौ.योगिता पाटील यांचे विशेष सत्कार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस दिलीप पंडित यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी केले.