(वरील छाया चित्र काल्पनिक आहे ). . भारत पवार : मुख्य संपादक . संजय बोर्ड , कार्यकारी संपादक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क करा : मो.९१५८४१७१३१. मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क साठी : संजय बोर्ड , कार्यकारी संपादक : _
◆ ड्रग्ज, गांजा, चरस, इंजेक्शनचा काळा व्यवसाय मोठ्या प्रमाणात
◆ संतोष नगर मधील एम ए प्लांस
◆ गेटजवळ संध्याकाळी गर्दुल्यांचा दरबार
◆ भीम नगर, काली बस्ती, शिवशाही कॉलनी, 90 सी डी परिसरांत अमली पदार्थ सहज उपलब्ध
◆ संतोष नगर झाला ड्रग्जचा अड्डा
◆ तरुण पिढी अडकली ड्रग्जच्या विळख्यात –
——
मुंबई पोलिसांनी गेल्या दोन-तीन वर्षात अंमली पदार्थ तस्करांचा कणा मोडला. गेल्यावर्षी ड्रग्ज तस्करीतील 637 जणांना अटक करत 409 खटले दाखल करून सुमारे 405 कोटी 55 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले. मात्र तरीही मुंबईतील काही ठिकाणे अंमली पदार्थ तस्कर व सेवन करणाऱ्यांचे अड्डेच बनले आहेत. अशाच एका अड्ड्यापैकी एक म्हणजे गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसर आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईमध्ये ड्रग्जचे अनेक हॉटस्पॉट आहेत, जेथे ड्रग्ज तस्करीचा व्यवसाय उघडपणे केला जातो. मुंबई उपनगरातील काही परिसर तर मुंबई पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. यापैकी एक म्हणजे गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसर आहे. संतोष नगरमध्ये सध्या ड्रग्ज,गांजा,चरस, इंजेक्शन यांचा काळा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.या परिसरामध्ये अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे.
असे कळते की, संतोष नगर परिसरातील एम ए प्लांस गेटजवळ संध्याकाळी काळोख पडल्यानंतर गर्दुल्यांचा दरबार भरतो आणि येथेच ड्रग्जचीं विक्री केली जाते. त्यामुळे येथे दिवसागणिक मारहाणीच्या घटनाही घडतात. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात गर्दुल्यांची हाणामारी होऊन एका 19 वर्षीय तरुणाचे डोळे फोडण्यात आले होते. त्यानंतर या परिसरात काही दिवस दहशतीचे वातावरण होते.
नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी ड्रग्जच्या मुद्द्यावर गंभीरपणे आवाज उठवला होता. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्थांनी यासंदर्भात दिंडोशी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीही केल्या. या तक्रारीनंतर पोलीस कारवाईसुद्धा होते. परंतु गर्दुल्ले मग दुसऱ्या ठिकाणी अड्डा तयार करतात. त्यामुळे दिंडोशी विधानसभेमध्ये ड्रग्जचा कारभार अखंडपणे सुरू आहे. या ड्रग्ज माफियांची पाळेमुळे मुंबईमध्ये इतकी घट्ट रोवली गेली आहेत की त्यांना मुळासकट उपटून टाकणे बरेच कठीण आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर अंमली पदार्थ सेवनाची सवय ही एखाद्या आजारपणासारखी असते. अंमली पदार्थाची नशा केल्यावर व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. अशा अवस्थेत नशाखोर व्यक्ती काय करेल, याचा काहीच नेम नसतो.
संतोष नगर परिसरात अनेक चव्हाटे आहेत. तसेच भीम नगर, काली बस्ती ,शिवशाही कॉलनी, 90 सी डी असे अनेक परिसर आहेत, जिथे अंमली पदार्थ सहजगत्या उपलब्ध होतात. हा काळा धंदा या परिसरात एवढा वाढला आहे की, जास्त प्रमाणात 15 ते 25 वयाची तरुण पिढी याच्या विळख्यात सापडली आहे.त्यामुळे गर्दच्या या विळख्यात सापडलेली ही तरुण पिढी काहीच काम धंदा न करता केवळ ड्रग्ज सेवनाचाच विचार करत असतात. ड्रग्ज विकत घेण्यासाठी पैसे नसल्यास प्रसंगी चोऱ्या माऱ्या करायलाही हे तरुण मागेपुढे पाहत नाहीत. जर वेळीच या काळ्या धंद्यावर अंकुश बसवला नाही. तर एखादे दिवशी एखादी भयंकर मोठी दुर्घटना होऊ शकते.
त्यासाठी वेळीच या विषवल्लीला उखडून टाकले पाहिजे. त्याचप्रमाणे या परिसरातील तरुणांना- मुलांना ड्रग्जबाबत जागरूक करणेही गरजेचे आहे. संतोष नगरातील झोपडपट्ट्यामध्ये ड्रग्जचा व्यवसाय तेजीत सुरु आहे. येथील स्थानिक रहिवाशांना याची कल्पना आहे. परंतु दहशतीमुळे कोणीही आवाज उठवत नाही.परंतु मुंबई पोलिसांनी ठरवले तर येथून ड्रग्जचा व्यवसाय हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.