भारत पवार , मुख्य संपादक. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क. मो ९१५८४१७१३१. देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यात अवैध धंदे सर्रासपणे. सुरू होते तरीही देवळा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरामात मौन पाळणे पसंत केले होते.त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला होता.कारण तालुक्याचे तहसीलदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे वास्तव्य देवळा हेडकॉटर ला आहे तरीही अवैध धंदे आरामात चालू होते यामागचे रहस्य गुलदस्त्यातच होते. काहीतरी चिरी मिरी चाटविल्याशिवाय अवैध धंदे सुरू होत नाहीत हे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा सांगता येईल.शेवटी नेता कर्तव्यदक्ष ,दमदार असावा लागतो.याचाच अनुभव देवळा आणि तालुकावासियांना नुकताच आला.
देवळा तालुक्यातील वाखारी येथील दिनेश अहिरे भीम सैनिक सामाजिक संघटनेचे जिल्हा नेते यांना आमरण उपोषणाचे शस्त्र उपसावे लागले .देवळा तालुक्यातील अवैध धंद्यांचे आणि खोट्या नाट्या व्यवहारांचे कर्दनकाळ आणि जागृत नेता म्हणजेच दिनेश अहिरे यांची तालुक्यात ख्याती आहे.तालुक्यात चालणाऱ्या अवैध धंद्यावाल्या विरुद्ध कडक कारवाई करून हे धंदे बंद करण्यात यावेत.तसेच मुद्रांक घोटाळ्यातील आरोपी. गोटू वाघ याचा निबंधक कार्यालयात अधिकच शिरकाव वाढला असून त्यास मनाई करण्यात येऊन त्यास आणि त्याच्या हस्तकांना कार्यालयात बंदी घालण्यात यावी या मागण्यासाठी दिनेश अहिरे यांनी काल आमरण उपोषण छेडले होते.
तहसीलदार विजय सुर्यवंशी , दुय्यम निबंधक शिंदे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी उपोषण स्थळी अहिरे यांची भेट घेत मागण्या मान्य करून लेखी आश्वासन देऊन तब्बल अकरा तास चाललेले आमरण उपोषण तहसीलदार सूर्यवंशी यांच्या हस्ते लिंबू पाणी देत दिनेश अहिरे यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली.