नवीमुंबई महानगर पालिकेने जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी : सचिन कदम

0
506

भारत पवार : मुख्य संपादक.                                   नवी मुंबई  : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  

सीवूडस प्रभाग क्रमांक १०९ मध्ये अनावश्यक रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणाची कामे काढली जातात … मनसेचा आक्षेप.

* पालिकेने जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी अन्यथा जनता तीव्र आंदोलन करेल … मनसे शहर सचिव सचिन कदम यांचा इशारा.*

नेरूळ, सीवूड्स पश्चिम मधील सेक्टर – ४२ अ मध्ये सावळा हॉस्पिटल ते तांडेल मैदान तसेच परिवहन डेपो ते करावे स्मशान भूमी पर्यंत व स्मशान भूमी ते डि मार्ट असे रस्ता दुरुस्ती आणि डांबरीकरणाचे काम सुरू आहे.

मुळात सावळा हॉस्पिटल ते तांडेल मैदान हा रस्ता तसेच स्मशान भूमी ते डी मार्ट रस्ता सुस्थितीत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे परिवहन डेपो ते करावे स्मशान भूमी पर्यंत रस्ता एवढा खराब नाही. काही प्रमाणात ओबड धोबड असणारा हा रस्ता पूर्वीच्या ज्या कंत्राटदाराने रस्ता बनवला आहे त्याच्या चुकीमुळे खराब झाल्याचे प्रथम दर्शनी दिसते. तरी पालिकेने परिवहन डेपो ते करावे स्मशान भूमी पर्यंत जो खराब रस्ता पूर्वीच्या कंत्राटदाराने बनवला आहे, त्याच्याकडून दंड वसूल केला आहे काय ? केला असेल तर किती केला आहे असा प्रश्न मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी उपस्थित केला आहे

मुळात नवी मुंबई कर अजूनही अनेक प्रश्नांना तोंड देत आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये अनेक वैद्यकीय उपकरणांचा, औषधांचा तुटवडा आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना अशा बाबी स्व: खर्चातून विकत घ्यावा लागत आहेत. सीवूड्स वासीय अनेक वर्षांपासून सुसज्ज अशा जलतरण तलावाची वाट पाहत आहेत. सीवूड्स वासीय एखाद क्रीडा संकुल असावे अशी इच्छा बाळगून आहेत. पण महानगरपालिका या वर खर्च न करता अनावश्यक बाबींवर खर्च करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

तरी महानगरपालिकेने तात्काळ ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी आणि वरील बाबींचे उत्तर येत्या सात दिवसात द्यावे. अन्यथा सीवूड्स मधील नागरिक या विरुद्ध आक्रमक पद्धतीने याबद्दल जाब विचारतील असा इशारा सचिन कदम यांनी पालिकेला दिला आहे.

सचिन कदम
शहर सचिव, मनसे, नवी मुंबई

* पाहिजेत : २लाख ७९ ह.३७ + वाचक संख्या असलेल्या ” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल साठी _  मुंबई , नवी मुंबईसह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.                                 मो. ९१५८४१७१३१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here